Monday, July 13, 2026
Homeदेसाईगंजहोय…! 'त्याच' अधिकाऱ्याने आणलाय नवा फिफ्टी- फिफ्टीचा फंडा… - देसाईगंजच्या 'त्या' अधिकाऱ्याला भोवणार...

होय…! ‘त्याच’ अधिकाऱ्याने आणलाय नवा फिफ्टी- फिफ्टीचा फंडा… – देसाईगंजच्या ‘त्या’ अधिकाऱ्याला भोवणार विविध कामांतील फिफ्टी-फिफ्टीचा फंडा … 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :- गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्याच्या शासकीय कार्यालयातील काही अधिकारी,कंत्राटदार यांच्याशी संगनमत करून विविध कामांतील फिफ्टी-फिफ्टीचा नवा फंडा वापरून “तुम्हारी चाल, हम मालामाल” अशी भूमिका सुरुवातीपासूनच बजावित असल्याने देसाईगंजच्या ‘त्या’ अधिकाऱ्याला फिफ्टी-फिफ्टीचा नवा फंडा चांगलाच भोवणार असल्याची खमंग चर्चा तालुक्यात दबक्या आवाजात सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,कुणी कल्पनाही करूच शकणार नाही; अशी शक्कल ‘त्या’ अधिकाऱ्याने लढवून नवा फिफ्टी-फिफ्टीचा फंडा उदयास आणला आहे.नवीन उदयास आलेल्या फंड्यावर एक नजर टाकली तर ‘त्या’ अधिकाऱ्याने करोडो रुपयांची मोहमाया गोळा केल्याचे कळते.सुरू केलेल्या नव्या फंड्यात ‘ज्यांची बिलांवर वा इतर दस्तऐवजांवर सही अशांनाच मिळणार पाकीट रुपी दही’ असे बोलले जात आहे.फंडा वापरणारे वरिष्ठ अधिकारी असल्याने कनिष्ठ अधिकारी वा कर्मचारी चुप्पी साधून ‘तुम्ही कराल ती पूर्वदिशा’ असे सगळेजण ठरवू लागल्याने यामध्ये ‘नाही आडवी रेषा नाही उभी रेषा’ असा प्रकार हल्ली सुरू आहे.

सुरू असलेल्या सदरच्या फंड्यामुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांना चुना लावून कामांच्या निधीची राखरांगोळी केली जात आहे.कामाचा दर्जा,तांत्रिक बाबी,गुणवत्ता व इतर बाबी निकृष्ट दर्जाची करून केवळ आवक बघितली जात आहे.त्यामुळे सर्वांगीण विकास म्हण्यापेक्षा केवळ ‘आपलाच विकास अन् कामे भकास’ होत असल्याने यावर कुठेतरी आळा घालणे आवश्यक झाले आहे.अशा प्रकारांमुळे हल्ली आमरण उपोषण,ठिय्या आंदोलन,अन्नत्याग आंदोलन,धरणे आंदोलन व इतर आंदोलनाचा पवित्रा अनेकजण घेतांना दिसून येतात.तरीही मुर्दाळ प्रशासनास जाग केव्हा येणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!