Sunday, September 13, 2026
Homeगोंदियाहृदय हेलावणारी घटना.! चारही भावांचे संपूर्ण घर जळून राख झाल्याने आई चिंताग्रस्त.....

हृदय हेलावणारी घटना.! चारही भावांचे संपूर्ण घर जळून राख झाल्याने आई चिंताग्रस्त.. – घर जळल्याचे दुःख सहन न झाल्याने हृदयविकाराचा धक्का..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-आपल्या आईपुढे कितीही संकटे उभी ठाकलीत तरीही आई एवढे दुःख जगात कुणीही पचवूच शकत नाही.मात्र,स्वतःच्या मुलांचे संसार उघड्यावर पडल्याने चिंतातुर झालेल्या आईला दुःख सहन न झाल्याने हृदयविकाराचा धक्का येऊन मृत्यू  झाल्याची हृदय हेलावणारी घटना गोंदिया जिल्ह्याच्या
देवरी तालुक्यातील मुरमाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तुंबडीकसा येथे काल,गुरुवारी १२ जून रोजी घडली.
गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील मुरमाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तुंबडीकसा येथे गिरधारी अरकरा,विनोद,रामू आणि मेसराम या चार भावांचे कुटुंब आईसह एकाच घरात राहत होते.अरकरा हे १० रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास शेजारच्या घरी बसलेले होते.दरम्यान अचानक सोसायट्याचा वारा सुरू झाल्याने घरावरून जाणाऱ्या विद्युत तारांचे एकमेकांना घर्षण होऊन आगीची ठिणगी अरकरा यांच्या घरावर पडली.वाऱ्यामुळे संपूर्ण घराला आग लागली.शेजारी व गावकऱ्यांना आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी अरकरा यांच्या घराकडे धाव घेतली व आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न केले.परंतु आग आटोक्यात येईपर्यंत चारही भावांचे संपूर्ण घर जळून राख झाले होते.आगीत पैसे,धान्य,कपडे,तांदूळ, शेतीकरिता घेतलेले बियाणे,महत्वपूर्ण दस्तऐवज पूर्णतः जळाले.तलाठी गायधने,कोतवाल कोटांगले, सरपंच रामदेव सौरी,पोलिस पाटील गुलाबदास हिरवाणी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा तयार करून शासनाला अहवाल पाठविला.या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली.तरी आगीमुळे चार भावंडांच्या घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने अरकरा कुटुंबीयांवर आर्थिक संकट कोसळले आहे.त्यातच आगीत घरातील संपूर्ण साहित्य जळून राख झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.यात आता आपले कुटुंब कसे सावरणार? अशी चिंता चारही भावडांची ६० वर्षीय आई मानकुवर लतखोर अरकरा यांना सतावू लागली. घर जळाल्याचे दुःख त्या सहन करु शकल्या नाही. यातच काल गुरुवारी त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याने अरकरा कुटुंबीयांवर दुहेरी संकट कोसळले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘जत्रा घडली नागोबाची’ या लोकनाट्यास सातारा येथील पुरस्कार जाहीर.. -यंदाचा सहावा पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट,डाकेवाडी(जि. सातारा)या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी साहित्यिकांसाठी उत्कृष्ट वाड्.मय स्पर्धा घेण्यात येते व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना स्पंदनच्या वार्षिक साहित्य संमेलनात उत्कृष्ट...

शाळेत विद्यार्थ्यांना दिली जाणारी शारीरिक शिक्षा पॉक्सो कायद्यांतर्गत लैंगिक गुन्ह्याच्या श्रेणीत येत नाही-सर्वोच्च न्यायालय -शिक्षकावरील संपूर्ण खटला रद्द..

उद्रेक न्युज वृत्त :-शाळेत शिक्षकाने दोन विद्यार्थिनींना दिलेल्या शिक्षेवरून शिक्षकाविरोधात नोंदवण्यात आलेला गुन्हेगारी खटला सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे रद्द करून शाळेत विद्यार्थ्यांना दिली जाणारी शारीरिक...

आपसी समझोत्याने ४६१ प्रकरणे निकाली; तब्बल ४ कोटी १६ लाखांहून अधिकच्या रकमेवर तडजोड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्हा न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये शनिवार १२...

कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील यादी गावपातळीवर प्रसिद्ध.. – गडचिरोली जिल्ह्यातील आतापर्यंत ४ हजार ३७१ शेतकऱ्यांच्या खात्यात २५ कोटी रुपये जमा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’च्या दुसऱ्या टप्प्यात गडचिरोली जिल्ह्यातील ३ हजार ६१० शेतकरी पात्र ठरले आहेत.पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!