Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजसहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली.. - शिवराजपुर गट ग्रामपंचायत येथील प्रकरण..

सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली.. – शिवराजपुर गट ग्रामपंचायत येथील प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या  शिवराजपुर गट ग्रामपंचायत अंतर्गत सन २०१५ ते २०२० मध्ये १४ वित्त आयोग निधीचा अपहार व बोगस कामांची चौकशी करून चौकशीअंती दोषींवर  फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तक्रार भाजपाचे पंचायत राज व ग्राम विकास विभागचे गडचिरोली जिल्हा सहसंयोजक कैलास बगमारे यांनी गडचिरोली जिल्हाधिकारी व सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी देसाईगंज यांच्याकडे केली होती.अश्यातच देसाईगंज उपविभागीय अधिकाऱ्यांनी देसाईगंज बीडीओ यांना कार्यवाही करण्यासंदर्भात पत्रनिशी कळवूनही अजून पर्यंत कुठल्याही प्रकारचे दखल घेण्यात येत नसल्याने सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली  दाखविण्याचा प्रकार हल्ली निदर्शनास येऊ लागला आहे.
अधिक माहिती अशी की,देसाईगंजच्या तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मानसी यांनी कैलास बगमारे यांच्या दिलेल्या तक्रारीअनुषंगाने २२ मे २०२५ ला बीडीओ पत्रव्यवहार करून तात्काळ तक्रार अर्जावर योग्य ती कार्यवाही करून सदर कार्यवाही बाबत अर्जदाराला परस्पर कळवावे आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल उपविभागीय अधिकारी कार्यालय देसाईगंज येथे सादर करावा असे दिलेल्या पत्रात म्हटले आहे.मात्र, २३ दिवसांचा कालावधी लोटूनही अजून पावेतो कुठल्याही प्रकारची चौकशी वा कार्यवाही करण्यात येत नसल्याने सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अवहेलना करण्यात येत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे  कैलास बगमारे यांनी म्हटले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!