- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-राज्य सरकारने होमिओपॅथी डॉक्टरांना औषधशास्त्र या विषयाचा एक वर्षाचा ब्रिज कोर्स (सीसीएमपी) पूर्ण केल्यानंतर ‘आधुनिक वैद्यकीय व्यवसायी’ म्हणून मान्यता देऊन त्यांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये नोंदणी करण्याचा निर्णय घेतला होता.मात्र,या निर्णयाला इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) विरोध करत आहे.त्यावर होमिओपॅथी संघटनेने तीव्र आक्षेप घेतला आहे.सरकारने आयएमएच्या दबावात निर्णय घेतल्यास येत्या १६ जुलैपासून राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य होमिओपॅथिक डॉक्टर्स कृती समितीने दिला आहे.त्यानुसार देसाईगंज शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी काल शुक्रवारी याबाबत देसाईगंज तहसीलदार यांच्या मार्फतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे.
केंद्र सरकारने यापूर्वी आयुर्वेद अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांना ॲलोपॅथीचा सराव करण्यास मान्यता दिली होती.याच धर्तीवर,आता महाराष्ट्र राज्य सरकारने होमिओपॅथी डॉक्टरांना एक वर्षाचा सीसीएमपी हा ब्रीज कोर्स पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी करण्यास मान्यता दिली आहे.या निर्णयामागे, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक बळकट करणे आणि डॉक्टरांची उपलब्धता वाढवणे हा उद्देश असल्याचे खुद्द सरकारने स्पष्ट केले होते.१५ जुलै २०२५ पासून हा आदेश लागू करण्याचा निर्णय शासनाने कायम ठेवला असून नोंदणी करण्याचे आवाहन सीसीएमपी कोर्स केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना करण्यात आले आहे.मात्र,या निर्णयाच्याविरोधात एमबीबीएस डॉक्टरांची असलेली संघटना आयएमएने आक्षेप घेतल्याने पेच निर्माण झाला आहे.राज्य सरकारच्या २०१४ च्या कायद्यानुसार १५ जुलै पासुन महाराष्ट्र मेडीकल कौन्सिल (MMC) तर्फे होमिओपॅथी सीसीएमपी नोंदणी (रजीस्ट्रेशन)सुरु न केल्यास राज्यातील एक लाख होमिओपॅथी डॉक्टर्स येत्या १६ जुलैपासुन महाराष्ट्र मेडीकल कौन्सिल व राज्य सरकार विरोधात
मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणासह बेमुदत आंदोलन करण्यात येणार असल्याचे शाखेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.निवेदन सादर करतेवेळी डॉ.जगदीश राऊत,डॉ.श्रीकांत बनसोड,डॉ. ओम बनसोड,डॉ.नागपूरकर,डॉ.सोहेल खान,डॉ.मिरधा
सह तालुक्यातील बहुसंख्य डॉक्टर उपस्थित होते.
- Advertisement -

