Thursday, September 17, 2026
Homeसिंदेवाहीसिंदेवाहीत अभियंता दिन उत्साहात साजरा.. - गडबोरीच्या विद्यार्थ्यांना नवोदय मार्गदर्शिका व शैक्षणिक...

सिंदेवाहीत अभियंता दिन उत्साहात साजरा.. – गडबोरीच्या विद्यार्थ्यांना नवोदय मार्गदर्शिका व शैक्षणिक साहित्याचे वाटप..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
प्रशांत गेडाम
सिंदेवाही(चंद्रपूर):-सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्त गडबोरी येथील जिल्हा परिषद शाळेत सर विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना नवोदय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शक पुस्तिका,शैक्षणिक साहित्य तसेच खाऊचे वाटप करण्यात आले.
यानंतर सिंदेवाही येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयात अभियंता दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी विविध शासकीय विभागांत कार्यरत अभियंत्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात उपविभागीय अभियंता षटगोपनवार, बांधकाम विभागाचे येढे व खुणे,सिंदेवाही पोलीस ठाण्याचे ठाणेदार पांडे तसेच सिंदेवाही नगरपंचायतीचे आंबोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.मान्यवरांनी अभियंता दिनाचे महत्त्व,अभियंत्यांची विकासातील भूमिका तसेच विद्यार्थ्यांनी तांत्रिक व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याची गरज यावर मार्गदर्शन केले.यावेळी विविध विभागांतील अभियंत्यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपविभागीय अभियंता षटगोपनवार,शाखा अभियंता वानखेडे, रामटेके,सहाय्यक अभियंता बिराजदार,सहाय्यक हागे, सामाजिक कार्यकर्ते संजय पुपरेड्डीवार तसेच प्रशांत गेडाम यांनी सहकार्य केले.कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पारंपरिक कारागीर व शिल्पकारांचा टूल किट व कर्ज मंजुरी पत्र वाटप सोहळा’ संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढवून जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी प्रत्येक नागरिकाच्या श्रमाला उत्पादकतेची जोड देणे आवश्यक आहे.पारंपरिक कारागीर,शिल्पकार आणि असंघटित...

सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा सफल; मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे..

उद्रेक न्युज वृत्त :-मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट २०२६ पासून सुरू केलेल्या उपोषणाची सांगता तब्बल २० व्या दिवशी संपुष्टात आल्याने...

आदर्श प्राचार्य पुरस्कार प्राप्त डॉ.राजाभाऊ मुनघाटे यांचा कुरखेडा शहर विचार मंचाच्या वतीने गौरव..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा ‘डॉ.जे.पी.नाईक आदर्श प्राचार्य’ पुरस्कार प्राप्त करून श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे यांनी गडचिरोली...

पोलीस हवालदार अडकला एसीबीच्या जाळ्यात; पोलिस ठाण्याच्या आवारातच सापळा कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका पोलीस हवालदारास तब्बल ४० हजाराची लाच घेतांना नागपूरच्या एसीबी पथकाने पोलिस ठाण्याच्या आवारातच रंगेहाथ पकडले.सचिन तायडे असे लाचखोर पोलिस हवालदाराचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!