Sunday, September 6, 2026
Homeचंद्रपूरसावधान...!मोबाईल वापरतांना सतर्कता बाळगा - मोबाईलच्या स्फोटात दुचाकीचा चेंदामेंदा

सावधान…!मोबाईल वापरतांना सतर्कता बाळगा – मोबाईलच्या स्फोटात दुचाकीचा चेंदामेंदा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर :- काही दिवसांपूर्वीच एका वृध्द व्यक्तीचा चार्जिंगवर मोबाईल लावून बोलत असतांना शरीर धडा वेगळा झाला होता.अशातच ही घटना ताजी असतांनाच पुन्हा एकदा मोबईलचा स्फोट होऊन दुचाकीचा चेंदामेंदा झाला आहे.

चंद्रपूर शहरातील विठ्ठल मंदिर वॉर्डातील एका मैदानाजवळ मोबाइलचा स्फोट झाला.सदर मोबाइल ओला झाल्याने दुचाकीवर सुकविण्यासाठी ठेवला असता काही वेळातच मोबाईलचा स्फोट झाला.मोबाईलचा स्फोट इतका भीषण होता की दुचाकीचा चेंदामेंदा झाला.सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. 

विठ्ठल मंदिर वॉर्डातील रहिवासी अशोक अंबिरवार यांचा मोबाइल पाण्याने ओला झाल्याने त्यांनी सदर मोबाईल वाळविण्यासाठी तो दुचाकीवर बाहेर ठेवला होता.मात्र काही वेळातच त्याचा स्फोट झाला. अचानक मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली.सदर घटनेत एमएच ३४ वाय ३३४३ दुचाकीचे नुकसान झाले.परंतु, सुदैवाने दुचाकी जवळ कुणीही नसल्याने जीवितहानी मात्र टळली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!