Wednesday, September 9, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसलग चार दिवस बँका राहणार बंद..!

सलग चार दिवस बँका राहणार बंद..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध कार्यालयात शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला आहे.मात्र, अद्याप बँक अधिकारी,कर्मचाऱ्यांसाठी दुसऱ्या व चौथ्या शनिवारव्यतिरिक्त सुट्टी जाहीर करण्यात आली नसल्याने केवळ बँकेच्या नोकरदरांवरच अन्याय कां?असा संतप्त सवाल उपस्थित करत बँकिंग क्षेत्रात पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या मागणीसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्यावतीने (युएफबीयू)येत्या,मंगळवार २७ जानेवारी रोजी अखिल भारतीय बँक संप पुकारण्यात आल्याने उद्याचा चौथा शनिवार,रविवार आणि सोमवार प्रजासत्ताक दिनाची सुट्टी व मंगळवारी संप,असे मिळून सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत.बँक संपामध्ये देशभरातील लाखो बँक कर्मचारी व अधिकारी सहभागी होणार आहेत.युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्समध्ये बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या नऊ प्रमुख संघटनांचा समावेश असून सार्वजनिक,खासगी, विदेशी,प्रादेशिक ग्रामीण तसेच सहकारी बँकांमधील कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत.बँकिंग क्षेत्रात आठवड्याला कामकाजाचे पाच दिवस लागू करावेत तसेच सध्या सुट्टी असलेल्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारव्यतिरिक्त उर्वरित सर्व शनिवार सुट्टी जाहीर करावी,ही या संपामागील प्रमुख मागणी आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष यांचा गडचिरोली दौरा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे उद्या,गुरुवार १० सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा...

कुलरमध्ये पाणी भरणे जीवावर बेतले; एकाचवेळी दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-कित्येकदा कुलर सुरू असतांना वा कुलरची बोर्डमध्ये लावलेली पिन न काढता कुलरमध्ये पाणी भरणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे.बऱ्याच नागरिकांना कुलरच्या विद्युत प्रवाहाचा...

ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारली ‘जनकल्याणम्’ अभ्यासिका.. – आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील उपक्रमाचे कौतुक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा गावातच उपलब्ध करून देण्यासाठी आरमोरी तालुक्यातील पळसगाव येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारलेली...

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!