Saturday, April 18, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय….शासकीय कार्यालयात कोंबडा मारण्याचे महत्व…..

संपादकीय….शासकीय कार्यालयात कोंबडा मारण्याचे महत्व…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

संपादकीय

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

उद्रेक न्युज वृत्त :- आपण अनेकदा अनुभवले असेलच की,एखाद्या कार्यालयात काही कामा निमित्त गेले असता; ज्याला आपण नेहमीच ‘साहेब’ म्हणतो असा व्यक्ती साहेब किंवा ‘सर’ नसतो; तर तो जनतेचा सेवक असतो.त्याला लोकसेवक म्हणून गणले जाते.मात्र त्याला आम्ही लोक ‘आदर’ व ‘मान तिथे महाजन’ की देत असतोच व त्यात काही कमीपणा नाही; असे समजतो.एखादे वेळेस अशा लोकसेवक व्यक्तींच्या टेबलावर स्वाक्षरी करण्यास अनेक दस्तऐवज ठेवले जातात.अशातच कामा निमित्त गेलेल्या व्यक्तींच्या समोर बाता मारून पटापट स्वाक्षरी करण्यास ते मागेपुढे पाहत नाही.त्यामुळेच शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयात कोंबडा मारण्याचे महत्व आजही कायम आहे.

एखाद्या व्यक्तीच्या वाढदिवशी दिनी,लग्न समारंभ,निवडणुका वा इतर कार्यक्रमांमध्ये कोंबडे मारून पार्ट्या करण्याचा हल्ली ट्रेण्ड सुरू झाला आहे. अशातच शासकीय वा निमशासकीय कार्यालयातील काही अधिकारी,कर्मचारी वा बाबू-ढबु यांना अजूनही कळलेले नाही; की आपल्याही कार्यालयात कोंबडा मारून पार्टी केली जाते.मात्र अशी केलेली पार्टी ही वरिष्ठांना लाभदायक असते.आपण सर्वच जण आश्चर्य चकित झाले असालच की,कोंबडा मारण्याची अशी कोणती पार्टी आहे की,वरिष्ठांना लाभदायक आहे; ती पार्टी म्हणजे कोणतेही कार्यालय असोत; अशा कार्यालयात वरिष्ठांना कुठली ना कुठली माहिती तयार करून दिली जाते.जसे की,सभा,देयक(बिल),माहिती अधिकार कायदा,प्रमाणके(व्हावचर) वा इतर अशी अनेक महत्वाची माहिती वरिष्ठांच्या टेबलावर स्वाक्षरी(सही) करीता ठेवण्यात येते.वरिष्ठांच्या टेबलावर स्वाक्षरी करीता ठेवण्यात आलेली संपूर्ण माहितीची जाण वा सर्वच कागदपत्रे वरिष्ठ तपासू शकणार नाहीत.त्यासाठी ज्यांनी माहिती तयार करून दिली आहे; अशांनी कोंबडा मारणे म्हणजेच तयार करण्यात आलेल्या माहितीच्या स्वाक्षरी नजीक पेनाने फुली मारणे होय.याचाच अर्थ असा की,दिलेली संपूर्ण माहिती ही खरी व परिपूर्ण आहे.त्यास सर्वस्वी जबाबदार माहिती पुरविणाराच असतो.मात्र अनेकांना याबाबत माहिती नसल्याने अशांच्या ‘घरावर गोटे’ येत असतात.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!