Monday, August 31, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तकोंढाळा येथील सुरज चौधरी यांची युवा पंतप्रधान पदी निवड...-  मुंबई येथे युवा...

कोंढाळा येथील सुरज चौधरी यांची युवा पंतप्रधान पदी निवड…-  मुंबई येथे युवा संसद मध्ये संपुर्ण महाराष्ट्राचे करणार नेतृत्व……

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- नेहरू युवा केंद्र,महाराष्ट्र व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवा संसद- २०२३ ची ४ नोव्हेंबर २०२३ रोजी निवडणूक झाली असून,दिनांक- ७ नोव्हेंबर ला निवडणुकीचा निकाल लागला.त्यात महाराष्ट्रातील तमाम युवांनी सुरज चौधरी यांना पंतप्रधान पदाकरीता प्रचंड मतांनी विजयी केले आहे.गडचिरोली जिल्ह्यात,सामाजिक शैक्षणिक,क्रिडा,सांस्कृतिक अश्या सर्वच क्षेत्रांत समाजासाठी कार्यरत,गडचिरोली जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त युवा,सुरज चौधरी यांनी अखेर युवा पंतप्रधान पदी नाव कोरला.अतिदुर्गम,मागास आणि नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह्या जिल्ह्यातील तरूणानी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी अभ्यास,कार्य,स्वभाव आणि आणि लोकशाहीच्या सहकार्याने थेट युवा पंतप्रधान पदापर्यंत मजल मारली. ही संपुर्ण जिल्हा वासियांना अभिमानाची बाब आहे.सुरज चौधरी हे देसाईगंज (वडसा)तालुक्यातील कोंढाळा या गावातील रहिवासी असून सामाजिक कार्यकर्ते आहेत.ग्रामविकासासाठी धडपडणारा तरूण अशी त्यांची ओळख आहे.या सोबतच प्रेरणादायी वक्ते,तरूणांचे मार्गदर्शक आणि विद्यार्थी ‌प्रिय शिक्षक म्हणून ते ओळखले जातात.अगदी जिल्हा परिषद शाळेपासूनच सुरज यांना नेतृत्वगुणाची आवड होती.ती आज युवा पंतप्रधान पदा पर्यंत पोहोचली असून सुरज चौधरी यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.माझ्यावर विश्वास टाकलेल्या महाराष्ट्रीतील तमाम युवांचे विश्वास मी आयुष्यभर जपेन व लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न करेल; अशी माहिती सुरज चौधरी यांनी दिली आहे.  त्यांनी आपल्या यशाचे श्रेय नेहरू युवा केंद्र चे जिल्हा समन्वयक पुंडे,मार्गदर्शक मीत्र नितीन गायकवाड, ओमकार पाटिल,गणेश माळी,सौरभ वाघमारे, 

तुषार माने,सुनील वाघमारे,स्वप्निल दळवी,तृप्ती मोकळं, प्रियंका ठाकरे कोमल दुर्गुडे,सलमान खान, प्रियंका गायकवाड,तेजस दोनाडकर,प्रशांत खांडवे, तुकाराम माळी तसेच महाराष्ट्रातील सर्व मित्र परिवार  व आपल्या जिल्ह्यातील संपूर्ण युवावर्ग आणि कोंढाळा गावाला दिले आहे.सुरज चौधरी यांच्या विजयाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!