Tuesday, September 22, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय....असेही एक दुकान 'त्यांना' ना आवाज द्यावा लागतो; ना दुकानाचे 'फलक' लावावे...

संपादकीय….असेही एक दुकान ‘त्यांना’ ना आवाज द्यावा लागतो; ना दुकानाचे ‘फलक’ लावावे लागते……-अन् चोरांचे पोटही भरावे लागते….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

संपादकीय

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 

उद्रेक न्युज वृत्त:- आपण सर्वच जण अचंभित झाले असालाच; की असे कोणते दुकान वा व्यवसाय आहे की,कुणाला ना आवाज द्यावा लागतो; ना दुकानाचे फलक(बोर्ड) लावावे लागते.अशातच कमाईचे साधन म्हणजे निव्वळ पैसाच-पैसा व आरामदायक जीवन जगणे तर आहेच; अशातही अश्या दुकानाच्या वा व्यवसायाच्या माध्यमातून तितकाच धोका व चोरांचेही पोट भरावे लागते.हेही तितकेच महत्त्वाचे आहे.आता आम्ही आपणांस सांगू इच्छितो की,असे कोणते दुकान वा व्यवसाय आहे तर,एक म्हणजे इमाने-इतबारे सुरू असलेला अवैध धंदा म्हणजे सट्टा-पट्टीचा व्यवसाय व दुसरा जोमाने व तितक्याच ताकदीने सर्वत्र- सगळीकडेच सुरू असलेला अवैध धंदा म्हणजे अवैध दारू विक्रीचा व्यवसाय होय.अशातच सध्याच्या घडीला आणखी एका अवैध धंद्याची भर पडलेली दिसून येत आहे.ती म्हणजे अवैध रेतीचा उपसा करून शासनास करोडो रुपयांचा चुना लावल्या जात आहे. आता आपण वळूया मुख्य बाबींकडे,एखाद्या इसमाने अवैध दारू विक्रीचा धंदा वा व्यवसाय सुरू केल्यास; अशा इसमांना कुणालाही आवाज देण्याची गरजच भासत नाही.एकदा धंदा सुरू केला म्हणजे ‘गंदा है पर धंदा है’ अशी किमयाच सुरू होते.एखाद्या तळीरामास एकदा माहीत झाले की,अमुक व्यक्तीकडे गावठी,देशी, विदेशी व थंडी बीयर मिळतेय तर ‘संगत मे पंगत’ असे होऊन डोलारे सुरू होतांना दिसून येतात.त्यामुळे अशा धंद्यासाठी ना भाड्याची खोली लागते; ना कुणाला आवाज द्यावे लागते; ना दुकानाचे नाव लिहावे लागते.

मात्र याला अपवाद म्हणजे परवानाधारक दुकाने आहेत.अवैध दारू विक्री धंद्यांचा भडिमार सुरू असण्याचे मुख्य कारण म्हणजे आरामदायक जीवन, झटपट पैसा,तगडी कमाई व सोयी-सुविधायुक्त जीवनशैली तसेच ‘ना बाप बडा ना भैय्या सबसे बडा रुपय्या’ हे आहे.सध्या स्थितीत काही शहरात तसेच ग्रामीण भागातील गावोगावी काही अंतरावरच अवैध दारू विक्रीच्या धंद्यांनी संसार थाटला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.काही गावांमध्ये कोणती दारू मिळतेय म्हणण्यापेक्षा ‘ती’ दारू याठीकाणी आणा; असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.परंतु जितकी सोयी-सुविधायुक्त जीवनशैली अशा धंद्यात आहे; तितकीच जोखीम व चोरांचे पोटही भरावे लागते.त्यामुळे अवैध दारूचे धंदे फोफावली आहेत.इमाने-इतबारे असलेला अवैध धंदा म्हणजे कागदावरचा चीटोरा; एका चीटोऱ्याला आज इतके महत्व प्राप्त झाले आहे की,दोन अंकी नाटक फसले तर समोरच्या व्यक्तीस रक्कम ही द्यावीच लागते व अशी रक्कम दिल्याशिवाय कुठलाही पर्यायच नसतो.नाहीतर मंदी आणि चालक-वाहक यांच्यावर बंदी झाल्याशिवाय राहणार नाही.यासाठीही ‘त्यांना’ ना आवाज द्यावा लागतो; ना दुकानाचे ‘फलक’ लावावे लागते; हे तितकेच महत्त्वाचे आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!