उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- माणसाने माणसाशी माणुस म्हणुन बोलायला नी वागायला शिकले की सुसंस्कृत समाजाची निर्मिती आपोआप होते.मात्र अलिकडे ही भावनाच लोप पावत चालल्याने समाजाची वाटचाल अराजकतेकडे सुरु असल्याचे दिसून येते.जे की भावी पिढीसाठी धोक्याची घंटा आहे.यातुन वेळीच सावरण्यासाठी व शिवरायांना अभिप्रेत असलेल्या समाज निर्मितीसाठी समाजात मानवता अधिक प्रभावीपणे रुजवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी केले.
देसाईगंज येथे २४ फेब्रुवारी २०२३ रोजी शिवजयंती उत्सव समिती फवारा चौकच्या वतीने आयोजीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पुणे जिल्ह्यातील वाघोली येथील सुदर्शन शिंदे यांच्या शिवव्याख्यानाच्या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.पुढे बोलताना आमदार गजबे म्हणाले की,समाजाच्या विकासातच राष्ट्राच्या विकासाची संकल्पना दडली आहे.ही बाब हेरुन शिवरायांनी सर्व धर्मियांना सोबतीला घेऊन स्वराज्याची मोट बांधण्यासाठी मानविय भावनेतून सलोखा निर्माण करून संकटांचा सामना केला.एकात्मतेचा दृढ विश्वासच त्यांच्या यशस्वीतेचा मजबूत पाया असल्याने व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असु शकतात.मात्र एकमेकांना समजून घेऊन वाटचाल केल्यास चांगली समाज व्यवस्था निर्माण करणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान शिवव्याख्याते सुदर्शन शिंदे यांनी देखील शिवरायांच्या जीवनावर प्रकाश टकात संघर्ष हेच जीवनाचे मुळ सार असुन संघर्षातुन ध्येय गाठणाराचा जीवनात यशस्वी होतो.दुसऱ्याचा आदर सन्मान केला की त्याची परतफेडही त्याच पद्धतीने होत असल्याने जीवनात संघर्ष करीत असताना मानवी मुल्ये जोपासले तरच शिवरायांना अभिप्रेत असलेल्या समाजाची,पर्यायाने देशाची निर्मिती करणे शक्य असल्याने सर्वांनी मिळून त्या दिशेने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे उद्घाटन जेसा मोटवाणी यांनी केले. सदर कार्यक्रमा प्रसंगी माजी सभापती परसराम टिकले,एसआरपिएफचे सहाय्यक समादेशक डि.एस.जांभुळकर,माजी नगराध्यक्षा शालु दंडवते,आंबेडकरी चळवळीचे डाॅ.चंद्रशेखर बांबोळे,माजी नगरसेवक गणेश फाफट आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.