- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):- “सामुहिक वन हक्क क्षेत्र विकास हीच आमची आस,गावातील लोकांना गाव शिवारातच लावू रोजगाराची कास” या उद्देशाने देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपूर येथील सामुहिक वन हक्क प्राप्त ग्रामसभा आणि सामुहिक वन हक्क व्यवस्थापन समितीने जिद्द,चिकाटी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी वाटचाल सुरु केली आहे.त्यानुसार, ‘विकसित भारत रोजगार व ग्रामीण आजीविका हमी’ योजने अंतर्गत आज,शुक्रवार १७ जुलै रोजी शिवराजपूर येथे रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडीच्या कामास प्रारंभ करण्यात आला. विशेष म्हणजे,सामुहिक वन हक्क ग्रामसभा म्हणून विकसित भारत रोजगार योजने अंतर्गत देसाईगंज तालुक्यातील रोजगार कामाला सुरवात करणारी ही पहिली ग्रामसभा ठरली आहे.
शिवराजपूर ग्रामपंचायतीस अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी वन हक्क मान्यता सुधारित अधिनियम २०१२ अंतर्गत २८९.४१ हे.आर.सामूहिक वनहक्क क्षेत्र प्राप्त झाले असून सामुहिक वन हक्क क्षेत्राच्या विकासासाठी ग्रामसभा प्रयत्नशील आहे. ग्रामसभेच्या माध्यमातून सामुहिक वन हक्क क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने वन व्यवस्थापन आराखडा तयार करण्यापासून ते त्याची अंमलबजावणी करण्यापर्यंत सातत्यमय अभ्यासात्मक प्रयत्न करून आज शुक्रवारी शिवाऱ्यादेव शिवराजपूर ते फरी रोड रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड कामाला सुरवात करण्यात आली.सदरचे
काम सतत तीन वर्षे चालणार असून सामाजिक वनीकरण विभागाच्या तांत्रिक मार्गदर्शनात सुरु करण्यात आला आहे.वृक्ष संगोपन,संवर्धन व संरक्षणाची जबाबदारी सामुहिक वन हक्क ग्रामसभा शिवराजपूरच्या ग्रामवासीय जनतेनी घेतली असून त्या दृष्टीने आम्ही नेहमी कार्यक्षम राहून भूमिका बजावू,या विश्वासाने कामाला सुरवात करण्यात आली आहे.प्रसंगी सामूहिक वन हक्क ग्रामसभा पदाधिकारी अध्यक्ष बाळकृष्ण आत्राम,सचिव बापूनाथ बेदरे, सदस्य अन्नाजी कुथे, राजेश्वर पिलारे,विद्या सूर्यवंशी,मंजुषा मेश्राम,अनंदाबाई हारगुडे,कविता कोडाप,भाग्यश्री कोडाप,सृष्टी संस्था ग्रामसभा मार्गदर्शक राकेश खेवले तथा गावातील मजूर वर्ग उपस्थित होते.
- Advertisement -

