Sunday, September 6, 2026
Homeदेसाईगंजशिक्षक दिनानिमित्त 'एक दिवस विद्यार्थ्यांच्या अध्यापनाचा'... -देसाईगंज युनिव्हर्सल कॉन्व्हेंट तथा डेव्हिडकीर्ती इंटरनॅशनल...

शिक्षक दिनानिमित्त ‘एक दिवस विद्यार्थ्यांच्या अध्यापनाचा’… -देसाईगंज युनिव्हर्सल कॉन्व्हेंट तथा डेव्हिडकीर्ती इंटरनॅशनल पब्लिक स्कुल येथे शिक्षक दिन साजरा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):- देसाईगंज शहरातील युनिव्हर्सल कॉन्व्हेंट तथा डेव्हिडकीर्ती इंटरनॅशनल पब्लिक स्कुल या ठिकाणी ५ सप्टेंबरला शिक्षक दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.शाळेने शिक्षक दिनानिमित्त ‘एक दिवस विद्यार्थ्यांच्या अध्यापनाचा’ राबवित शाळेतील विद्यार्थ्यांनी अध्यापनाची जबाबदारी पार पाडली.
शाळेतर्फे शिक्षक दिनाचे औचित्य साधून एक दिवस संपूर्ण शाळा चालवण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांवर सोपविण्यात आली होती.यामध्ये शालेय विद्यार्थिनी प्रणाली पडवेकर हिला मुख्याध्यापक होण्याचा मान मिळाला असून आस्था बोंडेकर हिने उपमुख्यध्यापक पदाची जबाबदारी सांभाळली तर प्रत्येक विषयाला शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली.दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांकडून माझे आदर्श,भारतीय संस्कृती,स्वतंत्र सेनानी या विषयावर वेशभूषा परिधान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.यात डॉक्टर,शिक्षक, सावित्री,अश्या वेगवेगळ्या वेषभूषा परिधान करून शिक्षकदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शाळेतर्फे विविध कार्यक्रम पार पाडण्यात आले.प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष प्रा.बाबा पडवेकर तर याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक पंकज मेश्राम,शिक्षिका विशाखा ठवरे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षकवृंद प्रामुख्याने उपस्थित होते.वेशभूषा स्पर्धा तसच इतर स्पर्धेच्या मूल्यांकनाची जबाबदारी
शिक्षक सोनपीपरे व शिक्षिका बगमारे यांनी पार पाडली तर श्रेया रणदिवे हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!