Friday, October 9, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तशहरांसह ग्रामीण भागही उष्णतेच्या विळख्यात.. - काळे रस्ते अन् सिमेंट-काँक्रिटच्या रस्त्यांनी नैसर्गिक...

शहरांसह ग्रामीण भागही उष्णतेच्या विळख्यात.. – काळे रस्ते अन् सिमेंट-काँक्रिटच्या रस्त्यांनी नैसर्गिक ओलावा नष्ट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-दिवसेंदिवस उष्णतेत भर पडत आहे. उष्णतेत वाढ कां होतेय याचा कधी कुणी विचार केला काय? पूर्वी “झाडे लावा झाडे जगवा” असे म्हटले जायचे, पण आता “झाडे तोडा अन् फॅशनेबल राहा” अशी स्थिती निर्माण झाली आहे.घर बांधकामापासून ते रस्ते बांधकाम व विविध बांधकामांनी वृक्षांचा नायनाट करणे सुरू आहे. त्यातच,शहरी भागातील डांबरापासून बनलेले काळे रस्ते आणि खुली पार्किंगची स्थळे सूर्याची उष्णता वेगाने शोषून घेतात.गडद रंगाची छते दिवसभर सौर ऊर्जा शोषून घेतात आणि ती आतच रोखून ठेवतात.
सिमेंट-काँक्रिटच्या उंच-उंच इमारती गरम हवेचा प्रवाह रोखतात,ज्यामुळे रात्रीही उष्ण राहतात.कारखाने,गाड्या, एसीमधून सतत निघणारी कृत्रिम उष्णता वातावरणाला आणखी तापवते.हल्ली ग्रामीण भागातही हीच अवस्था दिसून येत आहे.पूर्वी रस्ते मूळ जमिनीची धुळीने माखलेली असायची,मात्र आता गावातील रस्त्यांना सिमेंट काँक्रिटचा जोड देण्यात येऊ लागला आहे.काँक्रिट आणि सिमेंटमुळे पाणी जमिनीच्या आत जाऊ शकत नाही, ज्यामुळे पृष्ठभागाचा नैसर्गिक ओलावा नष्ट होतो.यामुळे
कोरडेपणा येऊन उष्णता वाढवतो.रात्री गारवा न मिळाल्याने शरीराचे अंतर्गत तापमान संतुलित होत नाही.वृद्ध व हृदयरोगाच्या रुग्णांमध्ये हार्ट अटॅक, स्ट्रोकचा धोका जास्त असतो.रात्रीच्या उष्णतेमुळे वनस्पती आपली ऊर्जा साठवण्याऐवजी ‘श्वसनात’ खर्च करतात.त्यामुळे पिकांचे दाणे लहान राहतात आणि उत्पादनात घट होते.पारा ३० अंशांच्या वर राहिल्याने गाढ झोप लागत नाही,ज्यामुळे थकवा आणि चिडचिडेपणा वाढतो.थंड करणारी उपकरणे चोवीस तास सुरू राहिल्याने विजेची मागणी सर्वोच्च स्तरावर राहते.ट्रान्सफॉर्मर थंड होऊ शकत नाहीत.ग्रीड फेल होण्याचा धोका वाढतो आहे.पुढील काळात उष्णतेचे काही खरे नाही.सध्या स्थितीत उष्माघाताचा आठ राज्यांना फटका बसू लागला आहे.यात महाराष्ट्र राज्यातील विशेषतः विदर्भ व पूर्व भाग,उत्तर प्रदेशातील मध्य व पश्चिम भाग,मध्य प्रदेशातील पूर्व आणि मध्य भाग,राजस्थानातील पूर्व भाग,ओडिशातील पश्चिम व अंतर्गत भाग,झारखंड राज्यातील पश्चिम भाग, तेलंगणातील जवळपास संपूर्ण राज्य तर आंध्रातील उत्तर किनारपट्टी व अंतर्गत भाग तीव्र उष्णेतेने होरपळला जातो आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रॅव्हल्स धारकाकडून वसुली करणे भोवले; सहाय्यक पोलिस निरीक्षक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहराच्या वाहतूक विभागातील  खंडणीच्या कथित प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी...

अतितीव्र ध्वनी उपकरणांवर बंदी; ध्वनीक्षेपकांसाठी लेखी परवानगी आवश्यक अन्यथा कारवाई.. -जिल्हा पोलिस अधीक्षक एम.रमेश

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्रोत्सव,शारदा व दुर्गादेवी विसर्जन, विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत.पोलीस...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात कलम ३६ जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्र,शारदा-दुर्गा उत्सव,विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन शांततेत पार पडावेत आणि कायदा व सुव्यवस्था राखली जावी,यासाठी पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी महाराष्ट्र पोलीस...

आता राज्यातील १८ तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता; तालुक्यांची यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार शासन स्तरावरून राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्याबाबत सविस्तर कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे.खरीप २०२६ च्या हंगामातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!