Monday, August 24, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तवाढत्या महागाईने सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम..

वाढत्या महागाईने सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-वाढत्या महागाईने पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम केला आहे. युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम स्पष्टपणे दिसू लागला आहे.घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरवाढीपासून सुरू झालेला हा फटका दुधाच्या दरवाढी पर्यंत पोहोचला आहे.औद्योगिक डिझेल,सोने तसेच सीएनजीचे दरही वाढले आहेत.आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या वाढीचा फटका थेट नागरिकांना बसत आहे. ‘महागाई’ ने पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरांच्या रूपाने नागरिकांना धक्का दिला आहे.काही शहरात पेट्रोलचा दर प्रति लिटर १०७.१३ रुपये तर डिझेलचा दर ९३.६७ रुपये इतका झाला आहे.विविध कंपन्यांनुसार या दरांत फरक असून, काही ठिकाणी पेट्रोल १०७.२६ रुपये तर डिझेल ९३.७९ रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे.इंधन दरवाढीमुळे पुन्हा एकदा महागाईचा भडका उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.याचा थेट परिणाम बाजारातील वस्तूंच्या किंमतींवर होणार आहे. मालवाहतूक महागल्याने अन्नधान्य,भाजीपाला,फळे तसेच इतर अत्यावश्यक वस्तूंचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.वाहतूक व्यावसायिकांचे म्हणणे आहे की, इंधनाच्या सतत वाढणाऱ्या किंमतीमुळे व्यवसायाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढत आहे.लवकरच दिलासा मिळाला नाही तर वाहतूक व्यवसाय तर अडचणीत येणारच,पण याचा फटका सर्वप्रथम सर्वसामान्य नागरिकांनाच सोसावा लागणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नालीच्या चेंबरवर मृतावस्थेत आढळला नवजात अर्भक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कामठी तालुक्यातील कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोखारा गावातील रस्त्यालगत असलेल्या नालीच्या चेंबरवर नवजात बाळाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

‘ई-पीक पाहणी’ मोबाईल ॲपच्या कटकटीतून शेतकऱ्यांची सुटका; गावनिहाय नियुक्त सहाय्यकच घेणार नोंदी..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने यंदाच्या 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत  केलेला बदल शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.यापुढे प्रत्येक शेतकऱ्याला स्वतः मोबाइलवरून ई-पीक पाहणी करण्याची...

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशा वादनाचा नवा विश्वविक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी नागपूरच्या रेशिमबाग मैदान येथील आयोजित 'मंथन फॉर युवा' (जेनझी संवाद)कार्यक्रमात ढोल-ताशा...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे दोन मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाची संततधार सुरू आहे.पावसामुळे काही ठिकाणची नाले पाण्याने भरभरून वाहू लागले आहेत. अश्यातच काही नाल्यांवरील पुल ठेंगणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!