- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-दारूच्या नशेत धुंद असलेल्या वरिष्ठ तंत्रज्ञाने कार्यालयातच धिंगाणा घालून ग्राहकांना अपशब्दांचा वापर केल्याचा प्रकार सडक-अर्जुनी येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात घडून आला.प्रकरणी धिंगाणा घालणाऱ्या
कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ तंत्रज्ञ गणेश बिसन प्रधान वय ४० वर्षे हा दि. २८ फेब्रुवारी रोजी दारूच्या नशेत झिंगाट होता व त्यातूनच त्याने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात धिंगाणा घातला.एवढेच नव्हे तर तो कार्यालयात येणाऱ्या ग्राहकांना अपशब्दात बोलत होता.विशेष म्हणजे,तो नेहमी दारूच्या नशेत येत असल्याने त्याच्यावर विभागीय कारवाई प्रस्तावित आहे.
तरी तो नेहमीच कार्यालयात मद्यप्राशन करायचा व कार्यालयात येणाऱ्या ग्राहकांशी अशभ्य वर्तन करीत होता.यातच त्याने दि.२८ फेब्रुवारी रोजीही तेच कृत्य केले.प्रकरणी ३४ वर्षीय सहाय्यक अभियंता विनोद विजय सोनकुवर यांच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलिसांनी आरोपी वरिष्ठ तंत्रज्ञ गणेश प्रधान याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८५ (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.त्याची वैद्यकीय चाचणी करून नमुने घेण्यात आले आहेत.पुढील तपास पोलिस हवालदार खोटेले करीत आहेत.
- Advertisement -

