- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.दिवसभर शेतातील कामे आटोपून विहिरीतून पाणी काढणार तितक्यात अचानकपणे पाय घसरून तोल गेला आणि थेट विहिरीतील खोल पाण्यात कोसळल्याने एका तरुण शेतकऱ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.अजय श्रीराम घोडमारे वय २८ वर्षे,रा.हिरापूर,ता.चिमूर, जि.चंद्रपूर असे विहिरीत पडल्याने बुडून मृत पावलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.ही धक्कादायक घटना काल रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास चिमूर तालुक्यातील हिरापूर गावनजीकच्या शेतशिवरात घडली.
अजय घोडमारे व एक बारा वर्षीय चिमुकला शेतावर गेले होते.अजय यांनी सकाळच्या सुमारास शेतात पिकांना पाणी देऊन काहीकाळ विसावा घेतला.त्यानंतर,दुपारी चारच्या सुमारास विहिरीतून पाणी काढत असतांनाच त्यांचा तोल गेला.विहीर तुडूंब भरलेली असल्याने ते खोल पाण्यात बुडाले.दरम्यान, सोबत असलेल्या चिमुकल्याने आरडाओरड करून थेट गावाकडे धाव घेत घोडमारे कुटुंबीयांना घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली.लागलीच कुटुंबीय व गावकऱ्यांनी शेताकडे धाव घेत बचावकार्यास सुरुवात केली.मात्र,तोपर्यंत खूप उशीर झाला होता. घटनेची माहिती पोलीस प्रशासनास मिळताच पोलिस हवालदार दुर्गेश नन्नावरे व पोलीस शिपाई लांजेवार यांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिमूर रुग्णालयात पाठवला. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून अचानकपणे घडलेल्या प्रसंगाने घोडमारे कुटूंबीय शोकसागरात बुडाला आहे.
- Advertisement -

