उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- आपण नेहमीच बघत असतो की,अमुक काम करायचे वा तमुक काम करायचे म्हटले की,संबंधितांकडून एवढी रक्कम लागणार वा इतके पैसे दिल्यास आपले पटकन व झटपट काम होणार असल्याची बतावणी केली जाते.मात्र अनेक सर्वसामान्य नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न घर करून जातात की,तथाकथित हरामखोरांना आम्हीच भुरळ पाडून पैश्याची चटक लावित असतो; त्यामुळेच ‘आमचे बोट आमच्याच डोळ्यात’ टाकून आमचाच वापर केला जातो आहे; असा हल्ली प्रकार काही जणांच्या लक्षात येऊ लागल्याने अशांवर आळा घालण्याचा प्रकार हल्ली निदर्शनास येऊ लागला आहे.अशाच प्रकारे फॉल्टी मीटरच्या दंडाची रक्कम कमी करून दिल्याच्या कारणासाठी तक्रारदाराकडून लाचेची मागणी करणाऱ्या महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनी आलापल्ली येथील उपकार्यकारी अभियंत्याला २० हजारांची लाच स्वीकारताना गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केल्याची कारवाई काल दिनांक- १७ ऑक्टोंबर २०२३ रोजी मंगळवारला केली आहे. विनोदकुमार नामदेवराव भोयर वय ४७ वर्षे असे लाच स्वीकारणा-या उपकार्यकारी अभियंत्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार,तक्रारदाराचे घरगुती मीटर फॉल्टी असल्याचे कारण सांगून उपकार्यकारी अभियंता विनोदकुमार भोयर यांनी अंदाजे २.२० लाख रुपये दंड भरावे लागेल; असे सांगून दंडाची रक्कम कमी करून ७३ हजार ६९८ रुपये केली.सदर दंडाची रक्कम कमी केल्याचा मोबदला म्हणून भोयर यांनी तक्रारदाराकडे ४० हजार रुपये लाचेची मागणी केली. मात्र तक्रारदाराला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक
विभाग गडचिरोली येथे तक्रार केली.एसीबीने तक्रारीची शहनिशा करून मंगळवारला कारवाईच्या दृष्टीने सापळा रचून उपकार्यकारी अभियंता भोयर यांना तक्रारदाराकडून २० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यांच्यावर गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी पोलिस स्टेशनमध्ये रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु होती.याप्रकरणी उपकार्यकारी अभियंता विनोदकुमार भोयर यांच्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील निवासस्थानाची चंद्रपूर एसीबीकडून झडती घेण्यात येत आहे.सदर कारवाई नागपूर एसीबीचे पोलिस अधीक्षक राहूल माकणीकर,अप्पर पोलिस अधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक श्रीधर भोसले,पोनि शिवाजी राठोड, सफौ सुनील पेद्दीवार, पोहवा नथ्थू धोटे,राजेश पद्मगिरीवार, पोशि किशोर ठाकूर,संदीप उड़ान,चापोना विक्रमजित सरकार यांनी पार पाडली.