- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज तालुका मुख्यालयापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोंढाळा येथे आज,सोमवार दिनांक-९ सप्टेंबरच्या मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास घरावर विजेची ठिणगी पडल्याने घरासहित जीवनावश्यक साहित्य जळून खाक झाल्याने नुकसानग्रस्त कुटुंबीय आर्थिक विवंचनेत सापडला आहे.
मध्यरात्रीच्या सुमारास संपूर्ण गावातील नागरिक गाढ झोपेत असतांना रात्रो १२.३० वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली होती.काही काळ पाऊस थांबताच लख्ख प्रकाशात गर्जन आणि विजा कडकडू लागल्या; अशातच गावातील झिंगर आत्माराम मेश्राम वय ६५ वर्षे रा.कोंढाळा,ता.देसाईगंज यांच्या घरावर अंदाजे रात्रो १ वाजेच्या सुमारास विजेची ठिणगी पडली. अशातच मेश्राम कुटुंबीय तसेच परिसरातील नागरिक गाढ झोपेत होते.विजांच्या कडकडांचा आवाज ऐकून झिंगर मेश्राम यांच्या घराशेजारील एक नागरिक रात्री १.३० वाजेच्या सुमारास लघुशंकेला उठले असता, मेश्राम यांचे घर जळतांना दिसून आले.लगेच त्यांनी आरडा-ओरड केल्याने परिसरातील नागरिक जागे झाले.मेश्राम कुटुंबीय घरातील दुसऱ्या खोलीत गाढ झोपेत असल्याने त्यांना साधी भनकही लागली नाही.आगीने रौद्ररूप धारण केले होते.कसे-बसे आगीवर नियंत्रण आणण्यात आले.आग आटोक्यात येताच मेश्राम कुटुंब जागे झाले.मात्र,तोपर्यंत घरासहित कुटुंबीयांचे वस्त्र,झोपेची खाट,कोंबडा,दुचाकी व इतर साहित्य जळून खाक झाले.जवळपास २ लाखांचे नुकसान झाले आहे.याबाबत गावातील सरपंचा अपर्णा राऊत,पोलीस पाटील किरण कुंभलवार,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील पारधी,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हरिभाऊ पत्रे,सामाजिक कार्यकर्ते अरुण कुंभलवार यांना माहिती मिळताच आज, सकाळच्या सुमारास झिंगर मेश्राम यांच्या घरी जाऊन पाहणी केली व देसाईगंज महसूल विभागाचे मंडळ अधिकारी ठाकरे तसेच तलाठी टीचकुले यांना नुकसानीचा पंचनामा करून तात्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.त्यानुसार मंडळ अधिकारी ठाकरे यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.
- Advertisement -