Friday, June 19, 2026
Homeनागपूरअजब प्रेयसीचा गजब सल्ला अन् खुनाचा झाला उलगडा...

अजब प्रेयसीचा गजब सल्ला अन् खुनाचा झाला उलगडा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-प्रियकराकडून खूनासारखा गंभीर गुन्हा घडल्यानंतर प्रेयसीने त्याला पळून न जाता आत्मसमर्पण करण्याचा सल्ला दिला. तिचे ऐकत प्रियकराने आत्मसमर्पण केल्यामुळे ५ सप्टेंबर रोजी झालेल्या खूनाचा उलगडा झाला. वाठोड्यात हे हत्याकांड घडले होते.करण उके असे आरोपीचे नाव आहे तर त्याने मोठा भाऊ मयूर ऊर्फ रॅपर संतोष उके याचा चाकूने भोसकून खून केला.
आरोपी करण उके हा बेरोजगार असून त्याचा मोठा भाऊ मयूर ऊर्फ रॅपर उके हा इंस्टाग्रामवर रॅप साँग किंवा रिल्स बनवित होता.त्याच्या वडिलाचे कोरोनामध्ये निधन झाले तर वृद्ध आई धुणी-भांडी करते.मयूरला दारुचे व्यसन होते.दारुच्या पैशासाठी मयूर सतत घरात भांडण करीत होता.तसेच घरातील भांडे-कुंडी किंवा वस्तू विकून दारु पित होता. त्यामुळे आई व भाऊ करण दोघेही त्रस्त झाले होते.
मयूर गेल्या काही दिवसांपासून पैशासाठी आईला मारहाणसुद्धा करायला लागला.त्यामुळे करणला नेहमी वाईट वाटत होते.यादरम्यान पाच सप्टेबरला मयूरने दारुच्या पैशासाठी आईला मारहाण केली. त्यावेळी करण घरी होता.त्याने मयूरची समजूत घालून घराबाहेर जाण्यास सांगितले.मात्र,त्याने करणला मारहाण करण्यास सुरुवात केली.चिडलेल्या करणने घरातील चाकू घेऊन त्याच्यावर दोनदा हल्ला केला. त्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात पडला.काही वेळातच मयूरचा मृत्यू झाला.ठाणेदार हरिष बोराडे यांना कुटुंबीयांवरच संशय होता.त्यामुळे त्यांनी करणच्या हालचालींवर बारिक लक्ष ठेवले.
करणने मयूरचा आईसमोरच खून केला.त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास त्याने भावाचा मृतदेह घराच्या छतावर नेला. तेथून तो मृतदेह चिखलात फेकून दिला. घरात येऊन त्याने रक्ताने माखलेले कपडे पेटवून दिले आणि राख शौचालयात टाकली.त्याच्या आईने घरातील रक्ताचे डाग स्वच्छ केले.मुलाचा खून झाल्याबाबत अनभिज्ञता दाखवत पोलिसांची दिशाभूल केली.
करण हा भावनिक असून त्याचे एका प्रिया नावाच्या तरुणीवर प्रेम आहे.गेल्या दोन वर्षांपासून त्यांचे एकमेकांशी प्रेमसंबंध आहेत.दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.प्रियाने प्रेमासाठी आपल्या आईवडिलांना सोडून करणला साथ देण्याचे वचन दिले होते.
भावाचा खून केल्यानंतर रात्री दोन वाजता प्रियाला भेटायचे आहे म्हणून एक मेसेज केला. दुसऱ्या दिवशी एका कॉफी हाऊसमध्ये दोघांची भेट झाली. तिला घडलेला सर्व प्रकार सांगितला. तिने त्याच्या अपकृत्याला साथ देण्याऐवजी थेट पोलिसांत जाऊन कबुली देण्याचा सल्ला दिला. प्रेयसीचा सल्ला त्याने मानला. त्याने वाठोडा पोलिसांकडे हत्याकांडाची कबुली दिली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!