- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.याप्रकरणी काल,शुक्रवारी न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या समक्ष सुनावणी झाली.तात्काळ अंतरिम दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला असून स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार नारायण जांभुळे यांनी सदरची याचिका दाखल केली आहे.
आज,शनिवारी न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या समक्ष सुनावणी होणार आहे.जांभुळे यांनी वडेट्टीवार यांच्या प्रतिज्ञापत्रावर आक्षेप घेतला आहे.वडेट्टीवार यांनी ज्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र सादर केले.तो त्यांच्या पत्नीने स्वतःच्या नावावर खरेदी केला.पत्नीच्या नावे
प्रतिज्ञापत्र सादर करू शकत नाहीत.त्यामुळे त्यांचे प्रतिज्ञापत्र अवैध आहे; तसेच हा स्टॅम्प पेपर करारनाम्यासाठी खरेदी करण्यात आला आहे.
मात्र,त्याचा उपयोग प्रतिज्ञा पत्रासाठी करण्यात आला.परिणामी यांचे नामनिर्देशन पत्र रद्द करण्यात यावे; अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.पुढील सुनावणी ११ नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे. याचिकाकर्ते ॲड.जांभुळे यांनी स्वतः बाजू मांडली तर राज्य सरकारतर्फे मुख्य सरकारी वकील देवेन चव्हाण, आणि ॲड.एस.एस.जाचक यांनी बाजू मांडली.
- Advertisement -