Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीव्यावसायिकांकडून लाखो रुपयांच्या हव्यासापोटी नियमांना तिलांजली.. - विनापरवाना खाद्यपदार्थ विक्रीचे व्यवसाय...

व्यावसायिकांकडून लाखो रुपयांच्या हव्यासापोटी नियमांना तिलांजली.. – विनापरवाना खाद्यपदार्थ विक्रीचे व्यवसाय फोफावले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-कुठलाही व्यवसाय करायचा असेल,तर त्यासाठी एफडीए(अन्न व औषध प्रशासन)व नगरपरिषद,नगरपंचायत वा ग्रामपंचायत या ठिकाणी नोंदणी करणे अनिवार्य आहे.व्यवसाय करतांना कुठल्या नियमांचे पालन केले पाहिजे,यासंदर्भात काही नियमही ठरवून दिलेले आहे.मात्र,सर्व नियम धाब्यावर बसवून शहरासह जिल्ह्यात विनापरवाना खाद्यपदार्थ विक्रीचे व्यवसाय फोफावले आहेत.
कुठल्याही चौकात जा,त्याठिकाणी अतिक्रमण करून ठिकठिकाणी उघड्‌यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या हातगाड्या लावलेल्या निदर्शनास येतात.शहरात या व्यवसायातून दररोज लाखो रुपये कमावले जातात. तथापि,जनआरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते.लाखो रुपयांच्या या व्यवसायापोटी सर्व नियमांना व्यावसायिकांकडून तिलांजली दिली जात असल्याचे वास्तव आहे.त्या ठिकाणी दूषित पाण्याचा वापर ग्राहकांना पिण्याकरिता केला जातो.स्वच्छता पाळली जात नाही.ज्याठिकाणी अन्नपदार्थ तयार केले जातात.तेथे पाळीव प्राण्यांचा संचार असतो.प्लेट धुण्यासाठी स्वच्छ पाण्याचा स्वतंत्ररित्या वापर केला जात नाही.तसेच बेसिंगची स्वतंत्र व्यवस्था नसते. एफडीएने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे; असे व्यवसायासाठी नोंदणी करतांना किंवा परवाना घेतांना नियमावली ठरवून दिलेली असते.मात्र,या नियमावलीचे कुठेच पालन होत नाही.बहुतांश प्रकरणात व्यवसायाची नोंदणी व परवानाही नसतो. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!