Saturday, September 12, 2026
Homeदेसाईगंजवाघोबा देवस्थान तपाळ येथे पद्म श्री डॉ.परशुराम खुणे यांचा जाहीर सत्कार

वाघोबा देवस्थान तपाळ येथे पद्म श्री डॉ.परशुराम खुणे यांचा जाहीर सत्कार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज :- चंद्रपूर जिल्ह्यातील वाघोबा देवस्थान तपाळ,ग्रामपंचायत बेलगाव(जानी) येथे देसाईगंज येथील खरकाटे परिवार व भाविक भक्त गणांनी कुल दैवत पूजा दिनाचे औचित्य साधून १४ एप्रिल २०२३ रोजी राष्ट्रपती पद्म श्री पुरस्कार प्राप्त डॉ.परशुराम खुणे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सुध्दा खरकाटे परिवार व भाविक भक्त गणांनी वाघोबा देवस्थान तपाळ येथे जाऊन कुल दैवतांची पूजा-अर्चना केली.त्यानिमित्ताने गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील गुरनोली येथील पद्म श्री पुरस्कार प्राप्त डॉ.परशुराम खुणे यांनी बाल कलाकार ते वयाच्या ७० व्या वर्षापर्यंत झाडीपट्टी रंगभूमीत मागील पाच दशके कलागुणांतुन समाज परिवर्तनाचे धडे देण्याचे अतुलनीय कार्य त्यांनी केले आहे.तसेच अनेक पुरस्कार प्राप्त करून गावातील सरपंच पदावर कार्यरत असतांना १५ वर्षे जनसेवा केली असल्याने सदर संपूर्ण केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना पद्म श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.खुणे यांचा जनसेवेतील प्रवास लक्षात घेता देसाईगंज येथील बाबुराव खरकाटे धान्य अडतिया यांच्या हस्ते वाघोबा देवस्थान तपाळ येथे पद्म श्री प्राप्त डॉ.परशुराम खुणे यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. 

सत्कार करतेवेळी देसाईगंज नगरपरिषदेचे माजी नगरसेवक तथा आरोग्य सभापती सचिन खरकाटे,प्रा.सुनील चौधरी प्राचार्य मनोहरभाई पटेल इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी गोंदिया,डॉ.ज्योती खरकाटे ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी,जनर्धन राऊत बी.ओ.गोंदिया,अशोक कुटे सेवा निवृत्त प्राचार्य,अरुण ठेंगरी सेवा निवृत्त शिक्षक,दुर्भाष खोब्रागडे नेवजाबाई हित.महिला महाविद्यालय ब्रम्हपुरी,सुभाष सौंदरकर,ताराचंद पत्रे,नरेंद्र बर्डे बाबु देसाईगंज आदर्श हायस्कूल,मित्र परिवार व वाघोबा देवस्थान तपाळ येथील बहुसंख्य भाविक भक्त उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!