- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा जंगल परिसरातील कक्ष क्रमांक-८०८ मध्ये वाघाने हल्ला चढवून गाभण म्हैस ठार केल्याची घटना आज,बुधवार २९ जानेवारीला दुपारच्या सुमारास उघडकीस आली. अशोक दोडकू दोणाडकर वय ४० वर्षे,रा.खरकाळा, ता.ब्रम्हपुरी,जि.चंद्रपूर असे म्हैस मालक नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,कोंढाळा गावापासून पश्चिमेस तीन किलोमीटर अंतरावर वैनगंगा नदी पात्र लागून आहे.सध्या स्थितीत नदीपात्रातील पाण्याची पातळी नाहीच्या बरोबर असल्याने पलीकडील ब्रम्हपुरी तालुक्याच्या खरकाळा,रनमोचन,पिंपळगाव परिसरातील गुराखी नदी पार करून नदी पात्रास लागून असलेल्या कोंढाळा जंगल परिसरात गुरे चराईसाठी आणित असतात.अश्याच प्रकारे खरकाळा येथील गुराख्याने काल,मंगळवारी २८ जानेवारीला कोंढाळा जंगल परिसरात गुरे चराईसाठी आणले असता गुरांच्या कळपातून गाभण असलेली म्हैस घरी परतली नसल्याने शेतकरी अशोक दोणाडकर यांनी शोधाशोध केली.शोधाशोध करीत असतांना म्हैस गाव परिसरात कुठेही आढळून न आल्याने त्यांनी आज कोंढाळा जंगल परिसरात शोध घेतला.शोध घेतला असता जंगल परिसराच्या कक्ष क्रमांक-८०८ मध्ये सदर म्हैस मृतावस्थेत आढळून आली.म्हशीच्या गळ्या जवळील भागाचे मास खाल्ल्याचे दिसून आल्याने सदर घटनेबाबत देसाईगंज वन परिक्षेत्र प्रादेशिक कार्यालयाचे वनक्षेत्र सहाय्यक के.वाय.कऱ्हाडे, कोंढाळा गावच्या महिला वनरक्षक नीलिमा सेलोटे यांना माहिती देताच घटनास्थळ गाठून पाहणी केली. त्यानुसार म्हशीला वाघाने ठार केल्याचे निष्पन्न झाले. सदर घटनेचा पंचनामा करून भरपाई देण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यास कळविले. कोंढाळा जंगल परिसरात वाघाचे वास्तव्य असल्याने शेतकरी तसेच ग्रामस्थांनी जंगल परिसर लागून असलेल्या भागात जातांना सतर्कता बाळगावी; असे आवाहन देसाईगंज वन विभागातर्फे करण्यात आले आहे.
- Advertisement -