Wednesday, September 2, 2026
Homeगोंदियावाघाच्या दहशतीत गावकरी भयभीत..!

वाघाच्या दहशतीत गावकरी भयभीत..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-जिल्ह्यातील देवरी,गोरेगाव आणि आमगाव तालुक्याच्या लागून असलेल्या सिमावर्ती भागात वाघाची दहशत असून आमगाव तालुक्यातील सोनेखारी ते येरमळा मार्गावरील घराबाहेरील गोठ्यात बांधून असलेल्या एका वासराची शिकार करून वाघाने जंगलाच्या दिशेने धूम ठोकल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.संपूर्ण परिसरात बंदोबस्त लावण्यात आला असून,वाघाच्या हालचालींवर पाळत ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.या परिसरात रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे सुरू असतांनाच सदरची घटना घडल्यामुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. परिणामी,खबरदारीचा उपाय म्हणून रोजगार हमी योजनेची सर्व कामे तातडीने थांबविण्यात आली आहेत.वन्यप्राण्यांच्या प्रकारामुळे प्रशासन सतर्क झाले असून,गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व इतर स्थानिक पदाधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले.त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधत परिसरात सावध राहण्याचे आवाहन केले.तसेच,वाघाच्या संभाव्य हालचालींचा मागोवा घेण्यासाठी कॅमेरे बसवण्याचा आणि गस्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.वनविभागाने गावकऱ्यांना रात्रीच्या वेळेस एकट्याने बाहेर न जाण्याचा सल्ला दिला असून, पाळीव प्राणी सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!