उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- बल्लारपूर नियतक्षेत्र कळमना अंतर्गत येत असलेल्या मौजा-पळसगाव तेंदू गोडावून परिसरात सस्यांची वाघरी लावून शिकार होत असल्याची गुप्त माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी बल्हारशाह यांना मिळाली.माहितीचे आधारे पळसगाव येथील तेंदू गोडावून मागील परिसरात सापळा रचून एकूण सात शिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
आरोपींमध्ये दिलीप रामा मेश्राम वय ३७ वर्षे,रा. गोंगले,जि.गोंदिया),राजू काशीराम मेश्राम, वय ३९ वर्षे, रा.उमरी, जि.भंडारा,भोजराम शंकर कोल्हे वय ३४ वर्षे, रा.सोंदळ,जि.गोंदिया,विनोद रामकृष्ण बेंडवार वय ४२ वर्षे, रा.सोंदळ,जि.गोंदिया),सुभाष वासुदेव चन्ने,वय ४४ वर्षे,रा.सोंदळ,ता.जि.गोंदिया, पुरुषोत्तम मोतीराम वलथरे वय ४५ वर्षे,रा.किन्ही,ता. साकोली,फागू पांडुरंग शेंडे वय ५० वर्षे,रा.किन्ही, ता. साकोली, जि.भंडारा यांना एक जखमी ससा व वन्यप्राणी शिकारीचे फासेसह ताब्यात घेतले व जखमी सस्याला उपचाराकरीता वन्यजीव उपचार केंद्र,ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प,चंद्रपूर येथे पाठविण्यात आले.परंतु उपचारादरम्यान ससा काल गुरुवारी ६ जून रोजी त्याचा मृत्यू झाला.
सदर आरोपींनी सस्यांचे मास खाण्यासाठी सस्याची शिकार केल्याची कबुली दिली.सातही आरोपीविरुध्द वन्यजीव संरक्षण अधिनियम अन्वये प्राथमिक वनगुन्हा दाखल केला आहे.तसेच वनगुन्ह्यात वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले.त्यानंतर आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना न्यायदंडाधिकारी,प्रथम श्रेणी न्यायालय,बल्लारपूर येथे हजर करण्यात आले. वनविभागामार्फत सरकारी वकील ॲडव्होकेट संगीता डोंगरे हे सदर प्रकरण पाहत आहेत.

