Sunday, April 19, 2026
Homeदेसाईगंजवर्षावास समापन सोहळा प्रसंगी कु.कल्याणी मेश्राम चा सन्मान-राहुल बुद्ध विहार देसाईगंज कोअर...

वर्षावास समापन सोहळा प्रसंगी कु.कल्याणी मेश्राम चा सन्मान-राहुल बुद्ध विहार देसाईगंज कोअर कमेटीचा उपक्रम

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :-

बुद्ध धम्मात महत्व असलेल्या वर्षावास समापन सोहळ्याप्रसंगी मंगळवारी महाराष्ट्र शासन सामाजिक व विशेष न्याय विभागामार्फत राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती संपादन करुन युनायटेड किंगडम या परदेशात फिलॉसाफर आँफ डॉक्टरेटचे (Ph.D.) उच्च शिक्षण घेणाऱ्या कु.कल्याणी मिलिंद मेश्राम या विद्यार्थीनींचे अभिनंदन करून व भारतीय संविधान भेट देवून बौद्ध समाज कोअर कमेटी देसाईगंज मार्फत सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.यावेळी कु.कल्याणीची आई रजनी मेश्राम सोबत होत्या.

बौद्ध समाज कोअर कमेटी व डॉ.भंदत राहुल सांस्कृत्यायण बुद्ध विहार यांचे संयुक्त विद्यमाने वर्षावास समापन सोहळ्याचे आयोजन किदवाई वार्डातील बुद्ध विहारात भदंत डॉ.धम्मदीप महाथेरो व भिक्खु संघाच्या उपस्थितीत करण्यात आले होते.  

सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी दि बुद्धिस्ट सोसायटी आँफ इंडियाचे नागपूर विभागीय अध्यक्ष विजय बन्सोड होते.तर प्रमुख अतिथी म्हणून बौद्ध समाज कोअर कमेटीचे कायदेशीर सल्लागार ॲड.बाळकृष्ण बांबोळकर,प्रसिद्धी प्रमुख राजरतन मेश्राम,सल्लागार डाकराम वाघमारे,अध्यक्ष प्रकाश सांगोळे,बुद्धिस्ट सोसायटीचे जिल्हाध्यक्ष इंजि.नरेश मेश्राम,अनिरुद्ध शहारे,उद्धवराव खोब्रागडे,कार्याध्यक्ष भिमराव नगराळे,उपाध्यक्ष साजन मेश्राम,सचिव हंसराज लांडगे,सुनील शहारे,बुद्ध विहाराचे अध्यक्ष पृथ्थलकुमार शिंदे,महिला मंडळाच्या अध्यक्षा रंजु मोहोरकर,कोअर कमेटीच्या उपाध्यक्षा अनिता मेश्राम, संघटिका मिना शेंडे,कोषाध्यक्ष सुरज ठवरे,सदस्या शेवंता बन्सोड,आशा दहिवले,कविता निरांजणे,टिना ठवरे,शोभा खोब्रागडे,लिना मेश्राम,शिला पाटील आदिंनी स्थान भूषविले.दरम्यान फातीमा शेख महाविद्यालयीन युवतीने भारतीय संविधानावर तसेच कल्याणी व लावण्य,देवांशी,रुष्टी,सौम्या,आयुष या बालकांनी आपले मनोगत व्यक्त केले.वर्षावास समापन सोहळ्याच्या यशस्वितेसाठी सुनंदा वासनिक, प्रिया सांगोळे,शुभांगी कोचे,लक्ष्मी भैसारे,कल्पना वालदे,साधना बांबोळकर,रंजु मोहोरकर,रजनी मेश्राम आदिंनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाला बौद्ध समाज कोअर कमेटीचे पदाधिकारी तसेच शहरातील व वार्डातील बहुसंख्य उपासक-उपसिका उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलिसांच्या एका चुकीमुळे गडचिरोली हत्या प्रकरणातील ‘त्या’ आरोपीस मिळाला जामीन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सात वर्षावरील गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला चोवीस तासांच्या आत न्यायालयातील न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करावे लागते.त्यानुसार,न्यायालय...

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!