- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील कोच्छी येथील एका २६ वर्षीय तरुणाने वडिलांनी मोबाइल खरेदीसाठी पैसे न दिल्याने रागाच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी १४ एप्रिलला घडली.विवेक नागरे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
विवेक हा वडिलांना मोबाईल खरेदीसाठी पैसे मागत होता.मात्र,वडिलांनी कर्जाची रक्कम बचत गट तसेच इतर संस्था यांच्या कडून घेतली होती.अगोदर उचल केलेल्या कर्जाची परतफेड करावयाची असल्याने त्यांनी मुलाला समजावण्याचा प्रयत्न केला.परंतु विवेक हा ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता.त्यातच घटनेच्या दोन दिवसांपूर्वी त्याने अती दारू प्यायला.त्यामुळे तो गावालगतच्या जंगल परिसरातील रस्त्यावर झोपलेला दिसून आला होता.कुटुंबीयांनी गावकऱ्यांच्या मदतीने त्याला घरी नेले.अशातच १४ एप्रिल रोजी विवेकने वडिलांना मोबाइलसाठी पैसे मागितले होते.वडिलांनी नकार दिल्याने दुपारच्या सुमारास घरी कुणीही नसल्याचे पाहून त्याने रागाच्या भरात घरीच नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.कुटुंबीय घरी परतल्याने विवेक हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला.घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केला.
- Advertisement -