Saturday, October 10, 2026
Homeचंद्रपूरलाभार्थी बचत गटाला देण्यात येणारे ट्रॅक्टर व उपसाधनांऐवजी मिळणार ३...

लाभार्थी बचत गटाला देण्यात येणारे ट्रॅक्टर व उपसाधनांऐवजी मिळणार ३ लाख रुपये…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना,मिनी ट्रॅक्टर व त्याची उपकरणे पुरविणे या योजनेत बदल करण्यात आला आहे.या योजनेंतर्गत लाभार्थी बचत गटाला देण्यात येणारे ट्रॅक्टर व त्याची उपसाधने हे वस्तु स्वरुपात न देता,आता मंजूर अर्थसहाय्य ३ लाख १५ हजार रुपये बचत गटाच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र स्वयंसहायता बचत गटांनी सहायक आयुक्त, समाजकल्याण,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,चंद्रपूर येथे संपर्क साधून अर्ज करावे; असे आवाहन सहायक आयुक्त समाजकल्याण यांनी केले आहे.

खाली दिलेल्या निकषांची पूर्तता करणे आवश्यक👇
स्वयंसहायता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्राचे रहिवासी असावेत,बचत गटातील किमान ८० टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावेत,यात अध्यक्ष व सचिवांचा समावेश असावा. राष्ट्रीयकृत बँकेत बचत गटाच्या नावे बैंक खाते असावे तसेच सदर खाते हे अध्यक्ष व सचिव यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असावे.स्वयंसहायता बचत गटाने खरेदी केलेला मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने ही भारत सरकारच्या केंद्रीय कृषी मंत्रालय आणि शेतकरी कल्याण विकास तसेच सहकार्य यांनी निर्धारीत केल्यानुसार फार्म,मशिनरी,ट्रेनिंग आणि टेस्टिंग इनस्टट्यूट यांनी टेस्ट करून जाहीर केलेल्या उत्पादकांच्या यादीतील परिमाणानुसार असावेत.
पात्र स्वयंसहायता बचत गटांना शासनाने त्या-त्या जिल्ह्यासाठी निश्चित करून दिलेल्या उद्दिष्टांनुसार अर्थसहाय्य मंजूर करून त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.योजनेच्या लाभासाठी निवड झालेल्या स्वयंसहायता बचत गटाला त्यांनी खरेदी केलेले मिनी ट्रॅक्टर चालविण्याचे अधिकृत संस्थेकडून प्रशिक्षण घेणे व त्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.बचत गटाने खरेदी केलेले मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने अर्थसहाय्य घेतल्यानंतर विकता येणार नाही किंवा गहाण ठेवता येणार नाही.तशा आशयाचे हमीपत्र देणे बंधनकारक आहे,ज्या स्वयंसहायता बचत गटांनी पॉवर टिलर किंवा मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेतला आहे,ते बचत गट या योजनेसाठी पात्र राहणार नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रॅव्हल्स धारकाकडून वसुली करणे भोवले; सहाय्यक पोलिस निरीक्षक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहराच्या वाहतूक विभागातील  खंडणीच्या कथित प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी...

अतितीव्र ध्वनी उपकरणांवर बंदी; ध्वनीक्षेपकांसाठी लेखी परवानगी आवश्यक अन्यथा कारवाई.. -जिल्हा पोलिस अधीक्षक एम.रमेश

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्रोत्सव,शारदा व दुर्गादेवी विसर्जन, विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत.पोलीस...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात कलम ३६ जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्र,शारदा-दुर्गा उत्सव,विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन शांततेत पार पडावेत आणि कायदा व सुव्यवस्था राखली जावी,यासाठी पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी महाराष्ट्र पोलीस...

आता राज्यातील १८ तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता; तालुक्यांची यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार शासन स्तरावरून राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्याबाबत सविस्तर कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे.खरीप २०२६ च्या हंगामातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!