Saturday, October 10, 2026
Homeमुंबईलाडकी बहिण योजना जैसे थे असणार,अपप्रचारास कुणीही बळी पडू नये... - माजी...

लाडकी बहिण योजना जैसे थे असणार,अपप्रचारास कुणीही बळी पडू नये… – माजी महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आजपर्यंत या योजनेच्या निकषांमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत; अशी स्पष्टोक्ती माजी महिला व बालविकासमंत्री,आमदार अदिती तटकरे यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर केली आहे.एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून याबाबतीत मी स्वतः जातीने लक्ष ठेवून आहे.याबाबत समाजमाध्यमांतून होणाऱ्या अपप्रचारास कोणीही बळी पडू नये; असेही आवाहन त्यांनी केले आहे.
राज्यातील गरीब व गरजू महिलांसाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली. या योजनेंतर्गत महिलांना दरमहा १,५०० रुपये दिले जातात.या योजनेमुळे महायुतीला पुन्हा सत्तेवर आणण्यास लाडक्या बहिणींनी हातभार लावला आहे. मात्र,महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर या योजनेच्या निकषांत बदल करणार असल्याचे रील्स व व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित केले जात आहेत.या योजनेचे निकष बदलण्यात आले असून, ते पूर्ण न करणाऱ्या अनेक महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत.या पार्श्वभूमीवर,तटकरे यांनी योजनेच्या निकषांमध्ये बदल झालेला नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रॅव्हल्स धारकाकडून वसुली करणे भोवले; सहाय्यक पोलिस निरीक्षक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहराच्या वाहतूक विभागातील  खंडणीच्या कथित प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी...

अतितीव्र ध्वनी उपकरणांवर बंदी; ध्वनीक्षेपकांसाठी लेखी परवानगी आवश्यक अन्यथा कारवाई.. -जिल्हा पोलिस अधीक्षक एम.रमेश

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्रोत्सव,शारदा व दुर्गादेवी विसर्जन, विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत.पोलीस...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात कलम ३६ जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्र,शारदा-दुर्गा उत्सव,विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन शांततेत पार पडावेत आणि कायदा व सुव्यवस्था राखली जावी,यासाठी पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी महाराष्ट्र पोलीस...

आता राज्यातील १८ तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता; तालुक्यांची यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार शासन स्तरावरून राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्याबाबत सविस्तर कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे.खरीप २०२६ च्या हंगामातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!