Wednesday, September 2, 2026
Homeगोंदियालग्न झाल्यानंतरही मागे लागला अन् शेवटी गुन्हाच दाखल झाला..!

लग्न झाल्यानंतरही मागे लागला अन् शेवटी गुन्हाच दाखल झाला..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-लग्नापूर्वी काही जणांचे मित्र,मैत्रिणी, प्रियकर व इतर गोष्टी ह्या आता सर्वसामान्य झालेल्या आहेत. एकदा कां विवाह बंधनात अडकले तर पूर्वी घडलेल्या गोष्टींवर पडदा टाकून संसाराचा गाडा चालविणे आवश्यक आहे.मात्र,काहीजण इतरांच्या स्वप्नांना भंग करू पाहतात.अश्याच प्रकारे नुकतेच मागील महिन्याच्या १० एप्रिल २०२५ ला विवाह बंधनात अडकलेल्या नवविवाहितेचा पूर्वी प्रियकर असलेला माथेफिरू तरुण लग्न झाल्यानंतरही मागे लागला आणि लग्नापूर्वीचे सोबत काढलेले आक्षेपार्ह फोटो व्हायरल करून विवाहितेची बदनामी केली.तो इतक्यावरच थांबला नाही,तर त्याने विवाहितेच्या वडिलाला व तिच्या पतीला तिच्यासोबत लग्नापूर्वी काढलेले आक्षेपार्ह फोटो पाठविले व एक दोन-वेळा नव्हे,तर तब्बल १२ मोबाईल क्रमांकांवरून वारंवार फोन करून तिचे लग्न तोडण्यासंदर्भात धमकी दिली. प्रकरणी आरोपी हतनाराम राठोड वय २५ वर्षे, रा.बोरोडा,ता.जि.सिरोही, राजस्थान याचेवर तक्रारीवरून आमगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३५१,(२),३५६, (२),७८ सहकलम ६७ (ए) माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
लग्नापूर्वी २४ वर्षीय तरुणीची ओळख आरोपी हतनाराम राठोड याच्या सोबत इन्स्टाग्रामवर झाली होती.ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले.त्यामुळे एकमेकांचे फोटो शेअर करणे व इतर बाबी घडू लागल्या.अश्यातच तरुणीचे लग्न आमगाव तालुक्यातील शिवणी येथील एका तरुणासोबत १० एप्रिल २०२५ रोजी रीतीरिवाजाप्रमाणे झाले.त्यामुळे आरोपी हतनाराम राठोड हा लग्न झाल्यापासून त्रास देऊ लागला.अश्यातच आरोपीने नवविवाहितेच्या माहेरच्या नावाने आयडी तयार करून प्रोफाइलवर तिचा फोटो लावला व सासरकडील तसेच माहेरच्याकडील लोकांना तिच्यासोबत लग्नापूर्वी काढलेले आक्षेपार्ह फोटो पाठवून ते व्हायरल करून तिची बदनामी केली.इतकेच नव्हे तर तिच्या पतीला व तिच्या वडिलांना फोन करून लग्न तोडण्याची धमकी दिली.प्रकरणी तक्रारीवरून आमगाव पोलिसांत प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!