Monday, August 31, 2026
Homeनागपूररेल्वे मार्गाचे काम; 'ही' रेल्वे गाडी धावणार नागपूर रेल्वे स्थानकापर्यंतच..

रेल्वे मार्गाचे काम; ‘ही’ रेल्वे गाडी धावणार नागपूर रेल्वे स्थानकापर्यंतच..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या गोंदिया रेल्वे स्थानकावर रेल्वे मार्गाचे नूतनीकरण,इंटरलॉकिंग, प्लॅटफॉर्मचा विस्तार आणि नवीन मार्गांची जोडणी यांसारखी तांत्रिक कामे युद्धपातळीवर सरू असल्याने मुंबईहून सुटणारी १२१०५ क्रमांकाची विदर्भ एक्स्प्रेस ही आता येत्या,२३ मे २०२६ पर्यंत गोंदियाऐवजी नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर थांबेल.तसेच,परतीच्या प्रवासात १२१०६ क्रमांकाची विदर्भ एक्स्प्रेस गोंदियाऐवजी नागपूर स्थानकावरूनच मुंबईसाठी रवाना होईल.या कालावधीत काही रेल्वे गाड्यांना पर्यायी थांबेही देण्यात आले आहेत.विशेष म्हणजे,१२१०५ आणि १२१०६ क्रमांकाची विदर्भ एक्स्प्रेस ही मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस(सीएसएमटी)ते गोंदियापर्यंत धावते.मात्र,गोंदिया स्थानकावर सुरू असलेल्या रेल्वे ट्रॅकच्या कामांमुळे विदर्भ एक्स्प्रेस क्रमांक १२१०५ आता नागपूरच्या मुख्य रेल्वे स्थानकावर अंतिम थांबा घेणार आहे.परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक १२१०६ विदर्भ एक्स्प्रेस गोंदियाऐवजी नागपूर स्थानकावरूनच मुंबईसाठी(सीएसएमटी)सुटेल.यामुळे गोंदियाकडे जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीत काही प्रमाणात बदल करण्यात आला आहे.केवळ विदर्भ एक्स्प्रेसच नव्हे, तर अन्य काही गाड्यांच्या फेऱ्यांवरही याचा परिणाम होणार आहे.या मार्गांवरून पुढे जाणाऱ्या काही निवडक रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.तर काही गाड्यांना दुसरे थांबे देण्यात आले आहेत.विदर्भ एक्स्प्रेस २३ मे पर्यंत गोंदियाऐवजी नागपूर स्थानकावरच थांबणार आहे.सदरच्या निर्णयामुळे गोंदिया,तुमसर आणि भंडारा या भागातील प्रवाशांना काही प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो.प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत ॲपवर किंवा संकेतस्थळावर वेळापत्रकाची खात्री करूनच आपल्या प्रवासाचे नियोजन करावे,असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!