- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या सावंगी येथील ग्रामपंचायत सदस्य रजनीकांत गुरनुले यांची राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या देसाईगंज तालुकाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील घोट येथे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या कार्यकारणीची बैठक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.प्रणय खुणे यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली.या बैठकीत देसाईगंज तालुक्यातील सावंगी ग्रामपंचायतीचे सदस्य रजनीकांत गुरनुले यांचे कार्य बघता संघटनेच्या देसाईगंज तालुकाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब, तळागाळातील शोषित वंचितांना न्याय देण्यासाठी रजनीकांत गुरनुले यांची नियुक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.प्रणय खुणे यांनी केली आहे.नियुक्ती करतेवेळी संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ता ग्यानेंद्र विश्वास,प्रदेश उपाध्यक्ष भारत खटी,विदर्भ अध्यक्ष जावेद सय्यद,विदर्भ कार्याध्यक्ष नेताजी सोंदकर,गोंदिया जिल्हाध्यक्ष गुड्डू खुणे,जिल्हाध्यक्ष मनीषा मडावी,जिल्हा संघटिका अनिता रॉय,जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी,जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना डहारे,चामोर्शी तालुकाध्यक्ष कालिदास बनसोड,राहुल झोडे,कृष्णा वाघाडे,नानू उपाध्ये,महिला आघाडी तालुकाध्यक्षा विशाखा शील,शरीफ शेख, किशोर देवतळे,दिनेश मुजुमदार आदी मान्यवर उपस्थित होते.प्रसंगी संघटनेचे मान्यवर तथा पदाधिकाऱ्यांनी रजनीकांत गुरनुले यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
- Advertisement -