उद्रेक न्युज वृत्त
संपादक/सत्यवान रामटेके
गडचिरोली :- दोन दिवसांपासून रात्रंदिवस सुरू असलेल्या पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना एकप्रकारे उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.अशातच शेतीच्या मशागती करीता पावसाची आतुरतेने वाट बघणाऱ्या शेतकरी बांधवांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.त्यानुसार शेतकरी बांधव शेत जमीनी वाहून पऱ्हे टाकण्याच्या तयारीत आहेत.
आज २७ जून २०२३ रोजी सकाळी झालेल्या तालुकानिहाय सरासरी पावसाची नोंद 👇
१) गडचिरोली : २८.५ मिमी पाऊस
२) कुरखेडा : ६३.४ मिमी पाऊस
३)आरमोरी : ५४.२ मिमी पाऊस
४) चामोर्शी : २०.६ मिमी पाऊस
५)सिरोंचा : २१.९ मिमी पाऊस
६) अहेरी : १७.५ मिमी पाऊस
७) एटापल्ली : १५.४ मिमी पाऊस
८) धानोरा : ३१.१ मिमी पाऊस
९) कोरची : १३६.७ मिमी पाऊस
१०) देसाईगंज : ५६.५ मिमी पाऊस
११) मुलचेरा : १८.२ मिमी पाऊस
१२) भामरागड : १८.१ मिमी पाऊस
जिल्ह्यातील सरासरी पावसाची नोंद ४०.२
कोरची तालुक्यातील कोटगुल येथे ९०.६,कुरखेडा तालुक्यात ७७.२ तर पुराडा येथे ७०.४ मुसळधार पावसाची हजेरी लावली आहे.
सर्वात जास्त पावसाची नोंद कोरची तालुक्यात १६२.२ मिमी पाऊस तर बेडगाव याठिकाणी १५७.४ मिमी पाऊसाची आज नोंद झाली आहे.