- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत महाराष्ट्र राज्यात बदल्यांचे सुर उमटू लागले आहेत.चालू वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी भारतीय प्रशासन सेवेतील बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या.विशेष म्हणजे चालू महिन्याच्या फेब्रुवारी महिन्यात तीनदा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.अशातच आता आज,मंगळवार १८ फेब्रुवारीला राज्यातील ९ आयएएस(IAS) अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत.यात गडचिरोली जिल्ह्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी राहुल कुमार मीना यांची लातूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.राहुल मीना हे २०२१ च्या बॅचचे आयएएस(IAS) अधिकारी आहेत.
मिलिंदकुमार साळवे यांची जिल्हा परिषद भंडारा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ.विजय सुर्यवंशी आयुक्त राज्य उत्पादन शुल्क मुंबई यांची विभागीय आयुक्त कोकण विभाग मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ.राजेश देशमुख विभागीय आयुक्त कोकण विभाग, मुंबई यांना आयुक्त राज्य उत्पादन शुल्क मुंबई नियुक्त करण्यात आले आहे.
नयना गुंडे आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांची महिला व बाल आयुक्त पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
विमला आर.राज्य प्रकल्प संचालक समग्र शिक्षा अभियान मुंबई यांची निवासी आयुक्त आणि सचिव महाराष्ट्र सदन नवी दिल्ली या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
सिद्धराम सलीमठ जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांची साखर आयुक्त पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ.सचिन ओंबासे जिल्हाधिकारी,धाराशिव यांची सोलापूर महानगरपालिका सोलापूर येथे महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- Advertisement -

