- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीदरम्यान भद्रावती येथील जिल्हा परिषद शाळेतील ३०९ क्रमांकाच्या बूथवर मतदान करण्यासाठी गेलेल्या एका राजकीय पक्षाच्या महिलेने ईव्हीएम टेबलावर आपटून नारेबाजी करीत राडा घातला.या प्रकरणात सदर महिलेवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली आहे.लता मन्सराम शिंगाडे वय ६५ वर्षे,रा.सुरक्षानगर,भद्रावती असे या महिलेचे नाव आहे.ही महिला बहुजनमुक्ती पार्टीची कार्यकर्ता आहे.दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास ही महिला मतदान करण्यासाठी जिल्हा परिषद शाळेच्या बूथ क्रमांक ३०९ वर गेली.मतदान करताना तिने ईव्हीएम मशीन उचलून जोराने टेबलावर आदळले आणि ‘ईव्हीएम हटाव,संविधान बचाव’ अशी नारेबाजी करत बॅलेट पेपरवर मतदान घ्या; अशा घोषणा दिल्या. घटनेनंतर मतदान केंद्रावरील अधिकारी तसेच सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले.या घटनेमुळे अर्धा तास मतदान प्रक्रिया थांबली होती.पोलिसांनी लता शिंगाडे या महिलेवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.पुढील तपास ठाणेदार अमोल काचोरी करीत आहेत.
- Advertisement -