Thursday, September 24, 2026
Homeमुंबईयेथे 'इम्पोर्टेड माल' चालत नाही; फक्त ओरिजनल 'माल' चालतो'.... - महिला उमेदवारास...

येथे ‘इम्पोर्टेड माल’ चालत नाही; फक्त ओरिजनल ‘माल’ चालतो’…. – महिला उमेदवारास ‘माल’ म्हटल्या प्रकरणी खासदार अरविंद सावंत अडचणीत…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-मुंबादेवी येथील शिंदेसेनेच्या उमेदवार शायना एन.सी.यांचा ‘इम्पोर्टेड माल’ असा वादग्रस्त उल्लेख केल्याने उद्धवसेनेचे खा.अरविंद सावंत अडचणीत आले आहेत.सावंत यांनी महिलांची प्रतिष्ठा जपली नसल्याचे म्हणत शायना यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. नागपाडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम ७९ आणि ३५६ (२) अन्वये गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना, ‘त्यांची अवस्था बघा, आयुष्यभर भाजपमध्ये राहिलेल्या आता दुसऱ्या पक्षात गेल्या आहेत.येथे ‘इम्पोर्टेड माल’ चालत नाही, फक्त ओरिजनल ‘माल’ येथे चालतो’, असे वक्तव्य खा. सावंत यांनी केले होते.त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उमटले आहेत.सावंत यांनी माफी मागावी,अशी मागणी शायना यांनी केली आहे.ते स्त्रीचा आदर करू शकत नाहीत.मी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे; असेही त्या म्हणाल्या. गदारोळ झाल्यानंतर खा. सावंत यांनी आपण कोणत्याही महिलेचा अपमान केला नसल्याचा दावा केला आहे.
डॉ.नीलम गोऱ्हे👇
‘माल’ शब्द वापरणे हा महिला वर्गाचा अपमान आहे. निवडणूक आयोगाने खा. सावंत यांच्याविरोधात त्वरित कारवाई करायला हवी. सावंत यांनी विनाविलंब माफी मागायला हवी,अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती व शिंदेसेनेच्या नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.
शायना एन.सी.,उमेदवार,शिंदेसेना👇
जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल.सावंत बोलत असताना आ.पटेल हसत होते.माफी मागावी लागेल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुढील तीन तासात दोन जिल्ह्यात बरसणार जोरदार पाऊस; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-उघडीप देणारा पाऊस कुठे जोरदार पडतो,तर कुठे एक थेंबही पडत नाही.निसर्गाचा लहरीपणा या वर्षी चांगलाच धडा शिकवायला लागल्याचे चित्र आहे.विशेष म्हणजे,काही...

निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन; डीजे मालक व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल.. – डीजे सह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा पवनपार येथील नवयुवक बाल गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्रेशर मिड(Pressure...

डुंबरसात्या आणण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गावालगतच्या जंगल परिसरात 'डुंबरसात्या' म्हणजेच मशरूम आणण्यासाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार २४ सप्टेंबर रोजी...

कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील रिक्त कोतवाल पद भरण्यास शासनाची मान्यता.. – महिला आरक्षण व रिक्त पदे भरण्याकरिता जातीचा प्रवर्ग निश्चित करण्यासाठी विशेष सभा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील गेल्या अनेक कालावधीपासून रिक्त असलेले कोतवाल(महसुल सेवक)पद भरण्यास शासनाने मान्यता दिली असून संबंधित गावातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!