Wednesday, June 17, 2026
Homeदेसाईगंजयेत्या ८ जानेवारीला पूर्व विदर्भातील मुस्लिम समाजाचा सामूहिक विवाह सोहळा देसाईगंज नगरीत..

येत्या ८ जानेवारीला पूर्व विदर्भातील मुस्लिम समाजाचा सामूहिक विवाह सोहळा देसाईगंज नगरीत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-पूर्व विदर्भातील मुस्लिम समाजाचा सर्वात मोठा सामूहिक विवाह सोहळा येत्या ८ जानेवारीला बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास देसाईगंज शहराच्या कमलानगर,किदवाई वार्ड या ठिकाणी संपन्न होणार आहे.दर वर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा एकूण २२ जोडपी विवाह बंधनात अडकणार आहेत.या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन अहेले मुस्लिम जमातच्या वतीने हाजी बशीर पटेल सौदागर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात करण्यात येणार आहे.कोरोना कालावधीतील दोन वर्षे वगळता यंदा मुस्लिम सामूहिक विवाह सोहळ्याचा हा बारावा वर्ष आहे.यात देसाईगंज मुस्लिम समाजातील युवक स्वतः पुढाकार घेऊन सर्व नियोजन करीत असतात. मुस्लिम समाजातील वर आणि वधूला अहेले मुस्लिम जमात सामूहिक विवाह सोहळा आयोजन कमेटीतर्फे पलंग,आलमारी आणि सर्व जीवनावश्यक वस्तूंची भेट दिल्या जाते.पूर्व विदर्भातील हा मुस्लिम समाजाचा सर्वात मोठा सामूहिक विवाह सोहळा समजला जातो. सदर विवाह सोहळ्यात जवळपास वीस हजार लोकांची उपस्थिती असणार आहे.विशेष म्हणजे इतर राज्यातील नागरिकही या विवाह सोहळ्यास हजेरी लावत असतात.येत्या ८ जानेवारीला २२ जोडपी विवाहबद्ध होणार आहेत.सदर विवाह सोहळ्यास जिल्ह्यातील आणि देसाईगंज शहरातील प्रतिष्ठित नागरिक,पत्रकार,राजकीय मंडळींसह सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मुस्लिम सामूहिक विवाह सोहळ्याचे संयोजक आणि प्रमुख मार्गदर्शक हाजी बशीर पटेल सौदागर यांनी केले आहे.विशेष म्हणजे सदर विवाह सोहळ्यास विदर्भातील लोकप्रतिनिधी सुद्धा उपस्थिती दर्शविणार आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार विभागाचे राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १८ जून...

डाटा एन्ट्री ऑपरेटरकडे चार हजार रुपये द्यायला सांगताच एसीबीची धाड; दोघेजण अडकले जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-मालमत्तेची नोंदणी करण्यासाठी गेलेल्या तक्रारदारास दुय्यम निबंधक कार्यालयातील दोन मालमत्तांच्या रजीस्ट्रीचे चार हजार रुपये लागतील,असे सांगून ते पैसे डाटा एन्ट्री ऑपरेटरकडे...

अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली; ‘या’ तारखेला येणार पीएम किसानचे दोन हजार खात्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी(PM-KISAN)योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दिला जाणारा २३ वा हप्ता हा येत्या,शनिवार २० जून २०२६ रोजी वितरित...

आता एमआरपीपेक्षा अधिक दराने खते विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासह परवाना रद्द करण्याची कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे,खते व कीटकनाशके वेळेत आणि योग्य दरात उपलब्ध व्हावीत,तसेच बोगस बियाणे विक्री,साठेबाजी आणि जादा दराने खतविक्रीच्या प्रकारांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!