उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- विदर्भ कोकण ग्रामीण बँक गडचिरोली तथा नवदृष्टी युवती मंडळ साखरा यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली तालुक्यातील मौजा मौशिखांब येथे “स्वच्छता व आर्थिक जनजागृती कलापथक तसेच मार्गदर्शन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमचे प्रमुख अतिथी म्हणून महादेव राणे क्षेत्रीय व्यवस्थापक विदर्भ कोकण ग्रामीण बँक चंद्रपूर,गजानन माद्दसवार वरिष्ठ व्यवस्थापक विदर्भ कोकण ग्रामीण बँक गडचिरोली,रुपाली गांधारवार उपसरपंच ग्रामपंचायत मौशिखांब योगाजी सावकार बनपूरकर,प्रतिष्टीत नागरिक मौशिखांब संस्थेच्या सचिव अर्चना चुधरी,दिनेश बोरकुटे सामाजिक कार्यकर्ता गडचिरोली व इतर मान्यवर कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते.
सदर कार्यक्रम मध्ये कलापथकाचे माध्यमातून कलावंतांनी स्वच्छता यात परिसर स्वच्छता स्वच्छतेचे फायदे हागणदारी मुक्त गाव,अस्वच्छतेमूळे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम तसेच ग्राम विकासात ग्राम सभेचे महत्व,बँकेच्या विविध योजना यात पंतप्रधान विमा योजना,जीवनज्योती विमा योजना पेन्शन योजना,अटल पेन्शन योजना,जनधन योजना तसेच विम्याचे सर्वसामान्य लोकांना होणारे फायदे इत्यादी बाबत मार्गदर्शन केले.
तसेच महादेव राणे क्षेत्रीय व्यवस्थापक विदर्भ कोकण ग्रामीण बँक चंद्रपूर यांनी बँकेच्या योजणांचा जास्तीत लोकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.सदर कार्यक्रमाचे संचालन गणपत मोहुर्ले यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार संस्थेच्या सचिव अर्चना चुधरी यांनी मानले.कला पथकातील गणपत मोहुर्ले,पवन भांडेकर,यमराज तुंकलवार,विनायक कोलपल्ली,राणा कोवे,शुभम रामटेके,सुनील मोहुर्ले,जयंती हर्षे,सचिन गोरडवार,कु.नाजुका गेडाम व प्रणाली यांनी उत्तम असे सादरीकरण केलेकार्यक्रममध्ये मौशिखांब येथील जनता बहुसंख्येने उपस्थित होती.