Thursday, June 4, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमोठी बातमी.. जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा दिला राजीनामा..

मोठी बातमी.. जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा दिला राजीनामा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-प्रकृतीच्या कारणास्तव
देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज, सोमवार २१ जुलै रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना पत्र लिहून राज्य घटनेतील कलम ६७(अ) नुसार तात्काळ प्रभावाने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यात जन्मलेल्या जगदीप धनखड यांनी १९८९ मध्ये खासदार म्हणून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती.पुढे जनता दल, काँग्रेस आणि भाजपा असा प्रवास करत २०१९ मध्ये ते पश्चिम बंगालचे राज्यपाल बनले होते.तर २०२२ मध्ये त्यांची देशाचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली होती.त्यांच्या राजीनाम्यामुळे आता उपराष्ट्रपती पदासाठी लवकरच निवडणूक होणार आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे राज्यसभेचे सभापती होते.संसदेचे आजपासून पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे.पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला आहे.त्यामुळे आता राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह हे तात्पुरते काम पाहतील.धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.आपण आरोग्य आणि डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे ते हे पद सोडत आहोत,असे धनखड यांनी म्हटले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

गोदाम बांधकाम,तेल काढणी युनिट,कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी लाखो रुपयांपर्यंत अनुदान.. – बना स्वतःच मालक; ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील भुईमूग,करडई,तीळ यांसारख्या तेलबिया पिकांचे तसेच तूर,हरभरा व इतर कडधान्यांचे उत्पादन वाढविण्यासोबतच त्यांचे मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी...

शाळेची पहिली घंटा वाजणार ‘या’ दिवशी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील वाढती उष्णता लक्षात घेता यंदा शाळेची पहिली घंटा उशिरा सुरू होण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून यंदा २०२६-२७ या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!