Thursday, June 4, 2026
Homeदेसाईगंजबस-दुचाकीची धडक; तरुणाचा मृत्यू.. - देसाईगंज-कुरखेडा मार्गावरील शंकरपूर जवळील आजची घटना..

बस-दुचाकीची धडक; तरुणाचा मृत्यू.. – देसाईगंज-कुरखेडा मार्गावरील शंकरपूर जवळील आजची घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या देसाईगंज-कुरखेडा मार्गावरील शंकरपूरच्या गाढवी नदी पुलाजवळील वळणावर बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन अपघातात दुचाकी चालक तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना आज,सोमवार २१ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली.पिंटू उर्फ महेश मधुकर देशमुख वय २९ वर्षे,रा.आझाद वॉर्ड,कुरखेडा, जि.गडचिरोली असे अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार,पिंटू हा आज सोमवारी दुपारच्या सुमारास कुरखेडा वरून एकटाच एमएच ३३ एक्स ७७३५ क्रमांकाच्या दुचाकीने उसेगाव जवळील अरतोंडी येथील एका नातेवाईकाच्या घरी शेतीच्या खताची चुंगडी नेऊन देण्यासाठी गेला होता.खताची चुंगडी दिल्यानंतर तो देसाईगंजला काही कामानिमित्त गेला.काम आटोपून पिंटू कुरखेडा जाण्यासाठी निघाला होता.अश्यातच शंकरपूरच्या गाढवी नदी पुलाजवळील वळणावर येताच एमएच १३ सीयु ७५१६ क्रमांकाची गडचिरोली डेपो आगाराची
बस कुरखेड्यावरून देसाईगंजकडे येत होती. त्याचवेळेस दुचाकी चालक पिंटू व बसची समोरासमोर धडक झाली.धडकेत दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाला.सदरचा मार्ग रहदारीचा असल्याने मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी तातडीने १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहीकेस पाचारण करून जखमीला देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.रुग्णालयात उपचार सुरू असतांनाच पिंटूचा मृत्यू झाला.प्रकरणी देसाईगंज पोलीसांनी मर्ग दाखल करून महामंडळाची बस देसाईगंज पोलीस स्टेशनला जमा केली.
पिंटू उर्फ महेश यास पाच वर्षाचा मुलगा असून पत्नीचे माहेर देसाईगंज शहराच्या जुनी वडसा येथील आहे. पिंटूच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

गोदाम बांधकाम,तेल काढणी युनिट,कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी लाखो रुपयांपर्यंत अनुदान.. – बना स्वतःच मालक; ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील भुईमूग,करडई,तीळ यांसारख्या तेलबिया पिकांचे तसेच तूर,हरभरा व इतर कडधान्यांचे उत्पादन वाढविण्यासोबतच त्यांचे मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी...

शाळेची पहिली घंटा वाजणार ‘या’ दिवशी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील वाढती उष्णता लक्षात घेता यंदा शाळेची पहिली घंटा उशिरा सुरू होण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून यंदा २०२६-२७ या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!