उद्रेक न्युज वृत्त
मुंबई:- मुंबईत स्पेशल ‘२६’ चित्रपटाची पुनरावृत्ती घडल्याचे समोर आले आहे.बनावट ईडी अधिकारी म्हणून आलेल्या भामट्यांनी झवेरी बाजारमधून तब्बल ३ किलो सोन्याचे दागिने आणि २५ लाख रुपये लुटल्याने खळबळ उडाली आहे.आपण साऱ्यांनी अभिनेता अक्षय कुमारचा स्पेशल ‘२६’ चित्रपट पाहिलाच असेल.हा चित्रपही एका खऱ्या घटनेवर बेतलेला आहे.या चित्रपटाची पुनरावृत्ती मुंबईत घडल्याचे समोर आले आहे.चक्क बनावट ईडी अधिकारी म्हणून आलेल्या भामट्यांनी झवेरी बाजारमध्ये जाऊन जोरदार लूटमार केली आहे.
ईडीचे अधिकारी म्हणून चार भामटे झवेरी बाजारात दाखल झाले.त्यांनी एका सराफा व्यावसायिकाच्या ऑफिसवर छापा टाकला.त्यांनी तिथे असलेल्या कर्मचाऱ्याला बेड्या ठोकल्या आणि या ठिकाणाहून तब्बल तीन किलो सोन्याचे दागिने लंपास केले. सोबतच पंचवीस लाखांची रोकडही उकळली.भामट्यांनी लुटलेल्या सोन्याच्या दागिन्यांची किंमत जवळपास १ कोटी ७० लाख रुपये असल्याचे समजते.शिवाय पंचवीस लाखांची रोकड;अशी भामट्यांनी दोन कोटींच्यावर माया लंपास केली आहे. या प्रकरणी चौघाविरुद्ध भादंवि कलम ३९४, ५०६ (२) आणि १२० ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू केला आहे. दोघांना ताब्यात घेत चौकशी सुरू केल्याचे समजते.सध्या सगळीकडे ईडीचा बोलबाला आहे.नेमके हेच हेरून चोरट्यांनी हा डल्ला साधला आहे.या लुटीमुळे सराफा व्यावसायिकांमध्ये खळबळ माजली आहे.