उद्रेक न्युज वृत्त
नवी दिल्ली :-सत्यजीत तांबे यांच्या बंडानंतर बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत काम करणे कठीण झाल्याचं पत्र बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना लिहिलं आहे.राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन थोड्याच दिवसांमध्ये सुरू होणार आहे; त्यामुळे नवीन गटनेता ठरवण्यासाठी काँग्रेसमध्ये वेगवान घडामोडी सुरू झाल्या आहेत.नव्या गटनेते पदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.पृथ्वीराज चव्हाण यांची काँग्रेस विधिमंडळ नेतेपदी वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावासाठी अनुकूल असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.विधिमंडळ गटनेते पदासाठी दिल्लीत झालेल्या चर्चेत पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावावर जोरदार चर्चा झाली.पृथ्वीराज चव्हाण आणि मल्लिकार्जुन खर्गे यांची जवळीक पाहता, पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.