उद्रेक न्युज वृत्त
जिल्ह्याच्या मोहाडीतील बसस्थानक परिसरात विचित्र घटना घडली असून अल्पवयीन मुलगी बसस्थानक परिसरात लघुशंकेसाठी गेली असता,एका तरूणाने छेड काढली.मुलीने लगेचच आरडाओरडा करायला सुरूवात केल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत प्रकरणा विषयी विचारले असता मुलीने सर्व घडलेल्या प्रकारचे कथन केले.कथन करताच मुलीची छेड काढणाऱ्या तरुणास संतप्त जमावाने चांगलेच चपलेने धो-धो धुतले आहे.