Tuesday, September 1, 2026
Homeमुंबईअबब....४महिन्यात खानपानाचे बील २ कोटी ३८ लाख रुपये..- चहा मध्ये सोन्याचे पाणी घातले...

अबब….४महिन्यात खानपानाचे बील २ कोटी ३८ लाख रुपये..- चहा मध्ये सोन्याचे पाणी घातले काय?- अजित पवारांचा खोचक टोला…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुंबई :- ‘वर्षा बंगल्याचे ४ महिन्यात खानपानाचे बील २ कोटी ३८ लाख रुपये खर्च करणे ही नवलाची बाब असून मी सुद्धा उपमुख्यमंत्री होतो.आमचे सहकारी मुख्यमंत्री होते.परंतु ४ महिन्यातील बील एवढे कसे? चहामध्ये सोन्याचे पाणी घातले होते काय? काही कळायला मार्ग नाही.करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी शिंदे फडणवीस सरकार वैयक्तिक रित्या करीत आहेत.”असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर खोचक टोला व टीका केली आहे.

अजित पवार म्हणाले,गेल्या ८ महिन्यात ५० कोटी राज्य सरकारने जाहीरातीवर  खर्च केला.मुंबई  महानगर पालिका कडून माहीती घेतली तर १७ कोटी रुपये जाहीरातींवर खर्च केला गेला आहे.एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडले परंतु,पानभर जाहीराती देवून उधळपट्टी होत आहे.सोमवारपासून राज्याचे अर्थसंकल्पीय विधीमंडळ अधिवेशन सुरू होणार आहे.त्यापूर्वी आज विरोधी पक्षांनी अधिवेशनातील रणनितीबाबत बैठक घेतली.  बैठकीला राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार,विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल करतांना ते बोलत होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!