Monday, June 22, 2026
Homeमुंबई'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेसाठी अडवणूक,दिरंगाई,पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई…-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या...

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक,दिरंगाई,पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई…-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुंबई :- ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे,अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास,प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्सनास आल्यास अशा अधिकारी,कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी; अशा सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलदगतीने होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे,या योजनेचे संनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी; असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

त्याचबरोबर योजनेसंदर्भातील कागदपत्रे उपलब्ध करुन देणे किंवा फॉर्म भरुन देण्याचे निमित्त करुन निर्माण होणारे दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत.एखाद्या कार्यालयात असा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित कार्यालय प्रमुखावर तसेच दलालांवर कठोर कारवाई करण्यात येईल,असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

योजनेसाठी नावनोंदणी,अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. योजनेच्या लाभासाठी पात्र महिलांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करुन देणे तसेच त्यानंतर योजनेचा फॉर्म भरणे इत्यादी संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात काल विधानभवन येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करुन योजनेची अंमलबजावणी पारदर्शक आणि जलदगतीने होईल यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. 

माता-भगिनींचे आयुष्य बदलवून टाकणाऱ्या विविध योजना राज्य शासनाने आणल्या आहेत.मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णयही लगेचच काढण्यात आला.या योजनेतील पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला १८ हजार रुपये राज्य सरकार देणार आहे.यासाठी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.ही योजना म्हणजे माता-भगिनींना माहेरचा आहेर आहे. नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज पडणार नाही, यादृष्टीने चोख नियोजन करावे,लाडक्या बहिणींची कोणत्याही कारणास्तव अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी; अशा सक्त सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी एकलव्य व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे क्रीडा,विज्ञान व कला क्षेत्रात करणार मॅपिंग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत आश्रमशाळा व एकलव्य मॉडेल निवासी विद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी त्यांच्या क्रीडा,विज्ञान तसेच कला व संस्कृती...

कर्जफेडीसाठी दिलेला चेक बाऊन्स; दोषीला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-एका बँकेकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम परतफेड करण्यासाठी दुसऱ्या बँकेचा चेक दिला खरी, पण जो चेक देण्यात आला,त्या बँकेच्या खात्यात पुरेसे पैसेच...

३० वर्षीय तरुणाचा नदीत बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील कोतेवाडा परिसराच्या वेणा नदीत बुडून एका ३० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे,नदीतील...

अवैध तंबाखू साठवणूक व विक्री करणाऱ्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्रात गुटखा,पानमसाला आणि सुगंधीत तंबाखूवर राज्य शासनाने १९ जुलै २०१२ पासून सक्तीची बंदी लादली; मात्र गेल्या १४ वर्षांत ही बंदी कागदोपत्रीच...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!