- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगडमध्ये सुरक्षा रक्षकांच्या वाढत्या कारवायांमुळे नक्षलवादी धास्तावले असून मारले जाण्याच्या भीतीने आज,बुधवार २६ मार्च रोजी
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात ९ तर दंतेवाडात ६ नक्षलींनी सुरक्षा दलांपुढे आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पण केलेल्या १५ ही नक्षलवाद्यांवर शासनाने नक्षली बंडू मलकावर ८ लाख तर यातील काहींवर ५ लाख व २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. सुकमाचे पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांनी याबाबतची माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे.केंद्र सरकारने ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत.त्यामुळे नक्षली मरण्यापेक्षा शरणागती बरी,असा पावित्रा घेऊ लागले आहेत.छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात ‘पूना नर्कोम’ तर दंतेवाडा जिल्ह्यात ‘लोन वर्राटू’ नावाने नक्षलवाद्यांच्या विरोधात सुरक्षा पथकांची मोहीम सुरू आहे.अशातच आत्मसमर्पण केलेल्या ९ नक्षलवाद्यांवर एकूण २६ लाख रुपये तर ६ नक्षलवाद्यांवर एकूण १३ लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते.दंतेवाडात आत्मसमर्पण केलेल्या नक्षालींमध्ये दोन महिला व चार पुरुष नक्षलवाद्यांचा समावेश आहे.
- Advertisement -