Thursday, September 24, 2026
Homeकोरचीमानेवर कुऱ्हाडीने वार करुन पत्नीला केले ठार…-कोरची तालुक्यातील चित्त थरारक घटना…

मानेवर कुऱ्हाडीने वार करुन पत्नीला केले ठार…-कोरची तालुक्यातील चित्त थरारक घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कोरची(गडचिरोली) :- पत्नी आणि आठ वर्षाची मुलगी झोपेत असताना आज २९ मे रोजी पहाटे ३ च्या सुमारास पतीने कुऱ्हाडीने वार करुन पत्नीचा खून केला.ही थरारक घटना कोरची तालुक्यातील बेतकाठी गावात घडली.अमरोतीन रोहिदास बंजार वय वय ३३ वर्षे असे मृत पत्नीचे तर रोहिदास बिरसिंग बंजार वय ४० वर्षे असे आरोपी पतीचे नाव आहे.पोलिसांनी रोहिदासला अटक केली आहे.

२००९ मध्ये रोहिदास व अमरोतीन यांचे लग्न झाले. त्यांना ४ मुली आहेत.नवव्या वर्गात शिकणारी मोठी मुलगी ही घटनेच्या वेळी छत्तीसगडला आपल्या मामाच्या गावी गेली होती.तर मधल्या दोन मुली आपल्या आजीच्या घरी झोपल्या होत्या.घरी रोहिदास, अमरोतीन आणि सर्वात लहान मुलगी झोपले होते.

पहाटे तीन वाजताच्या सुमारास रोहिदासने अमरोतीनच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करुन ठार केले. यात ती जागीच मृत्यू झाली.त्यानंतर रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन रोहिदास बाजार चौकात गेला.काही वेळाने कुऱ्हाड पाण्याने धुऊन ती घरामागच्या झुडुपात फेकली.लहान मुलीने आईचा खून झाल्याचे बघताच आक्रोश केला.तिच्या रडण्याने शेजारच्या घरात राहणारा रोहिदासचा मोठा भाऊ नोहारसिंग जागा झाला.त्याने काही युवकांच्या मदतीने रोहिदासला पकडून खुर्चीत बसवून खांबाला बांधून ठेवत पोलिसांच्या स्वाधीन केले.पोलिसांनी त्याला अटक केली असून पोलीस निरीक्षक चंद्रकांत वाबळे घटनेचा तपास करीत आहेत.

रोहिदास आणि अमरोतीन यांना चार मुली आहेत.१५ वर्षीय माधुरी नववीत, १३ वर्षीय मनिषा सातवीत, ११ वर्षीय कौशल्या पाचवीत, तर ८ वर्षीय वैशाली दुसऱ्या वर्गात शिकत आहे. आईचा खून झाल्याने चारही मुली सैरभैर झाल्या.त्यांचे हुंदके बघून गाव सुन्न झाले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन; डीजे मालक व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल.. – डीजे सह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा पवनपार येथील नवयुवक बाल गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्रेशर मिड(Pressure...

डुंबरसात्या आणण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गावालगतच्या जंगल परिसरात 'डुंबरसात्या' म्हणजेच मशरूम आणण्यासाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार २४ सप्टेंबर रोजी...

कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील रिक्त कोतवाल पद भरण्यास शासनाची मान्यता.. – महिला आरक्षण व रिक्त पदे भरण्याकरिता जातीचा प्रवर्ग निश्चित करण्यासाठी विशेष सभा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील गेल्या अनेक कालावधीपासून रिक्त असलेले कोतवाल(महसुल सेवक)पद भरण्यास शासनाने मान्यता दिली असून संबंधित गावातील...

कृषी विभागातील तब्बल १४ हजार ४४५ तांत्रिक अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून दुष्काळग्रस्तांना एक दिवसांचे वेतन..

उद्रेक न्युज वृत्त :-निसर्गाच्या लहरीपणाचा नेहमीच शेतकरी बांधवांना फटका सहन करावा लागतो आहे. कधी अवकाळी पाऊस,तर कधी किडीचा प्रादुर्भाव,तर कधी ऐन हंगामात धो-धो पावसामुळे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!