Thursday, August 6, 2026
Homeगोंदियामाजी सैनिकास पैश्याची मागणी; महिला लिपिक एसीबीच्या कचाट्यात..

माजी सैनिकास पैश्याची मागणी; महिला लिपिक एसीबीच्या कचाट्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-एका ३६ वर्षीय महिला लिपिकेस(महसुल सहाय्यक)माजी सैनिक यांचे ताब्यात असलेली सिलींगची अतिक्रमीत जमीन माजी सैनिक म्हणुन त्यांचे नावावर नियमीत करुन देण्याच्या बदल्यात दिलेल्या अर्जावर कार्यवाही करण्याकरीता ५० हजाराची लाच रक्कमेची मागणी करुन त्यापैकी १० हजाराची लाच घेतांना रंगेहाथ अटक करण्यात आली.शालु कमलेश कावळे वय ३६ वर्षे,पद-महसुल सहाय्यक(लिपिक), तहसिल कार्यालय-गोंदिया असे लाचेची मागणी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार,तक्रारदार हे भारतीय नौसेनाचे माजी सैनिक व पोलीस खात्यातुन सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक असुन ते ग्राम तेढवा ता. गोंदिया येथील सिलींगची जमीन भुमापन क्र.१७४ वर सन २००२-२००३ पासुन अतिक्रमण करुन शेती करत आहेत.माजी सैनिक असल्याने शासनाकडुन सदर सिलींगची जमीन मिळावी म्हणुन ७ मे २०२६ रोजी तहसिलदार गोंदिया यांना त्यांचे ताब्यात असलेली जमीन Maharashtra Agricultural Land(Celling on Holding’s)Act1961 अंतर्गत अतिक्रमण नियमीत करुन त्यांचे नावावर देण्यात यावी याबाबत अर्ज केला होता.त्यांचे अर्जावर कार्यवाही करण्याकरीता तहसिल कार्यालय गोंदिया येथील लिपिक श्रीमती शालु कावळे ह्या ५० हजार रुपयांची मागणी करीत असल्याने तक्रारदार यांनी मंगळवार १६ जून २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे तकार नोंदविली.तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन १६ मे २०२६ रोजी दुपारच्या सुमारास पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी कार्यवाही करून काल,बुधवार १७ मे २०२६ रोजी दुपारच्या सुमारास सापळा कारवाई केली असता शालु कावळे यांनी दिलेल्या अर्जावर कार्यवाही करण्याकरीता ५० हजाराची लाच रक्कमेची मागणी करुन त्यापैकी आता १० हजार रुपये द्या व काम झालेवर उर्वरीत ४० हजार रुपये लाच रक्कम देण्याबाबत बोलुन १० हजाराची लाच रक्कम स्विकरण्याची तयार दर्शवुन ती लाच रक्कम पंचासमक्ष स्वीकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले.या प्रकरणी निलेश सुरेश लोधी,पोलीस उपअधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शालु कमलेश कावळे यांचे विरूध्द गोंदिया शहर पोलिस ठाण्यात अपराध क्रमांक-४४९/२०२६ कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनीयम १९८८(संशोधन २०१८)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया तर्फे सर्व नागरीकाना आव्हान करण्यात येते की,भ्रष्टाचार संबंधाने कोणी लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास ला.प्र.वि.महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेशी संपर्क करावा.
संपर्काचा पत्ताः- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया, तिरोडा रिंग रोड,रेल्वे क्रासिंग जवळ गोंदिया पिन ४४१६०१
संकेत स्थळ:- acbmaharastra.gov.in
टोल फ्रि कमांक :- १०६४
दुरध्वनी क्रमांक :- ०७१८२ २५१२०३
व्हॉटसअप क्रमांक:- ९२०९०४१०६४, ७६२०३८३८८८
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कोठी-पिपलीबुर्गी मार्गावरील पुलाच्या नुकसानीची होणार उच्चस्तरीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हालेवारा-कोठी-रेगाडंडी-पिपलीबुर्गी मार्गावरील सा.क्र.६/९०० येथील मोठ्या पुलाच्या नुकसानीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारी निश्चित करून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर...

मुसळधार पावसाचा फटका..! मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यात अनेक ठिकाणी पडलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष सखोल...

वाघाचा हल्ला; एकाचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र काही केल्या थांबेना.मानव वाघांच्या दडित जातो की,वाघ मानवांच्या दडित येतो,हेच कळेनासे झाले आहे.हल्ली मानवाची केवळ किंमत ठरवली जात...

बापरे..!अंतिम संस्काराची तयारी सुरू असतांनाच मृतक व्यक्तीने उघडले डोळे..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्यात एक अचंभित करणारी घटना काल मंगळवारी उघडकीस आली.एका ४० वर्षीय व्यक्तीची प्रकृती अचानक खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!