उद्रेक न्युज वृत्त
कोरपना ता.प्र./नितेश केराम
चंद्रपूर(कोरपना) :- कोरपना तालुक्यातील सुमारे ५२ ग्रामपंचायतचे कर्मचारी आपल्या हक्काच्या मागणीसाठी गेल्या वीस वर्षा पासून शासन दरबारी आपल्या व्यथा मांडीत आहेत.परंतु सदर कर्मचाऱ्यांकडे अजून पावेतो शासन दुर्लक्ष करीत असल्याने येत्या २० जुलै २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना कर्मचारी; मुंबई येथील विधानसभेवर धडक मोर्चा देणार आहेत.ग्रामपंचायत कर्मचारी रात्रंदिवस गावाची धुरा सांभाळत आहेत.कोरोना काळात जीवाचे रान करून जनतेची सेवा केली आहे.काही जणांना जास्त वेतन वा मानधन देऊन ग्रामपंचायत कर्मचारी वर्गांना तुटपुंजे वेतन व मानधन दिले जात असल्याने शासनाने ग्रामपंचायत कर्मचारी वर्गांची थट्टा चालविली आहे.
ग्रामपंचायतीचे कर्मचारी शासन दरबारी आपल्या हकाच्या मागणीसाठी गेल्या वीस वर्षापासून शासन दरबारी जाऊन आपल्या व्यथा मांडत आहे.परंतु या कर्मचाऱ्यांकडे अजूनहि शासन दुर्लक्ष करीत आहे.आजच्या घडीला अंगणवाडी सेविकेला जवळपास १० ते १२ हजार रुपये आणि अंगणवाडी मदतनीस यांना ८ हजार रुपये तर ग्रामसेवक यांचे वेतन सुमारे ७० हजार रुपये आहे.तर ग्रामपंचायत कर्मचारी वर्गांना शासन ठेंगा दाखवीत असल्याने ग्रामपंचायत कर्मचऱ्यांना वेतन व जुनी पेन्शन लागू करण्यात यावी व इतर विविध मागण्या संदर्भात महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना कर्मचारी मुंबई विधानसभेवर धडक मोर्चा देणार आहे.